मावेजा वाटपाची प्रकल्पग्रस्तांनी दिली शासनाला २८ तारखेची "डेड" लाईन..!

विनोद आपटे
Friday, 26 July 2019

नांदेड: गेल्या ३४ वर्षापासून शासन व राजकीय पुढाऱ्यांनी लेंडी प्रकल्पग्रस्तांना मावेजाच्या व पुनर्वसानाच्या नावाखाली खिळून ठेवले. आवार्ड पास होऊनही वाटपाची व पुनर्वसानाची प्रक्रिया ठप्प असून शासन धरण पुर्ण करण्याचा हालचाली करत आहे. त्यामुळे प्रकल्प ग्रस्तांनी घराचा मावेजा देण्यासाठी रविवार (ता. २८) पर्यंत मुक्रमाबाद येथील शासनाला डेड लाईन दिली आहे. शासनाने मावेजा दिला नाही तर सोमवार (ता. २९) पासून जिल्हाअधिकारी कार्यालय समोर बेमुद्दत  अमरण उपोषण करण्याचा ईशारा दिला.
             
महाराष्ट्र व तेंलगाना राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने १९८४ साली गोणेगाव येथे लेंडी नदीवर धरणाची उभारणी करण्यात आली. या धरणात एक हजार ३१० घरे समाविष्ट करण्यात आली. पण येथील प्रकल्पग्रस्त गेल्या ३४ वर्षापासून पुनर्सन व मावेजासाठी शासन दरबारी खेटे मारत आहेत.

प्रकल्प ग्रस्तांना मावेजा मिळावा व पुनर्वसनाची कामे मार्गी लागावी म्हणून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकरी यांची भेट घेतली. ५ जुलै पासून मावेजा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी शिष्ठमंडळा दिले होते. परंतु, २० दिवसाचा कार्यकाळ लोटलेला असतानाही संपादित घरांच्या मावेजा वाटपास अद्यापही सुरूवात झाली नाही. 

मुक्रमाबाद येथील घरांचा मंजूर झालेला मावेजा हा शासनाकडे जमा असतानाही शासनाकडून मावेजा देण्यात येत नाही. जिल्हाधिकारीही एखाद्या राजकीय पुढाऱ्यांप्रमाणे मावेजा वाटप करतो असे आश्वासन देऊनही मावेजा वाटप करत नाहीत मग आम्ही विश्वास ठेवायचा कोणावर? असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडलेला आहे.

रविवार (ता. २८) पर्यंत मुक्रमाबाद येथील संपादीत घरांचा मावेजा वाटप केला नाही तर भाजपाचे गटनेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर, सभापती अशोक पाटील रावीकर यांच्यासह तीस प्रकल्पग्रस्त सोमवारी सकाळी ११ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळऊन देण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार
मुक्रमाबाद येथील प्रकल्पग्रस्त ३४ वर्षापासून शासनाकडे घरांचा मावेजा द्या व योग्य ठिकाणी पुनर्वसन करा म्हणून लोकशाही पध्दतीने मागणी करत आहे. शासन त्यांना ढावळ आहे. या प्रकल्प ग्रस्तांनी आपली घरे व शेती देऊन मोठा त्याग केला. आज यानांच मावेजा द्या म्हणून शासनकडे फिरावे लागत आहे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना मावेजा मिळत नाही. योग्य ठिकाणी त्यांचे पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत यांच्या न्यायासाठी शासनाच्या व सरकारच्या विरोधात लढतच रहाणार
 - व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा परिषद गट नेते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News