प्रोजेक्‍ट बंधनातून व्यावसायिकतेचे धडे 

अरुण मलानी
Saturday, 26 January 2019

नाशिक : मेळघाटातील बांबू केंद्रातर्फे पुरविण्यात येणाऱ्या बांबूच्या राख्यांची विक्री करण्याच्या हेतूने प्रोजेक्‍ट बंधनची २०१३ पासून सुरवात करण्यात आली होती. प्रोजेक्‍ट बंधनच्या माध्यमातून विपणन वस्तू विक्रीचा अनुभव विद्यार्थी घेत आहे, करीअरच्या दृष्टीने हा उपक्रम फायदेशीर ठरतो आहे. आतापर्यंत तब्बल पंधरा लाख रूपये विद्यार्थ्यांनी जमविले आहेत. सुरवातीच्या वर्षात विद्यार्थ्यांना परीश्रम घ्यावे लागले. विद्यार्थ्यांनी समुह करत मोक्‍याच्या ठिकाणी स्टॉल लावत बांबूच्या राख्यांची विक्री केली.२००१८ मध्ये चार लाख ६१ हजार रूपये या माध्यमातून संकलित करण्यात आले आहेत.

नाशिक : मेळघाटातील बांबू केंद्रातर्फे पुरविण्यात येणाऱ्या बांबूच्या राख्यांची विक्री करण्याच्या हेतूने प्रोजेक्‍ट बंधनची २०१३ पासून सुरवात करण्यात आली होती. प्रोजेक्‍ट बंधनच्या माध्यमातून विपणन वस्तू विक्रीचा अनुभव विद्यार्थी घेत आहे, करीअरच्या दृष्टीने हा उपक्रम फायदेशीर ठरतो आहे. आतापर्यंत तब्बल पंधरा लाख रूपये विद्यार्थ्यांनी जमविले आहेत. सुरवातीच्या वर्षात विद्यार्थ्यांना परीश्रम घ्यावे लागले. विद्यार्थ्यांनी समुह करत मोक्‍याच्या ठिकाणी स्टॉल लावत बांबूच्या राख्यांची विक्री केली.२००१८ मध्ये चार लाख ६१ हजार रूपये या माध्यमातून संकलित करण्यात आले आहेत. संकलित रक्‍कम राखी उत्पादन करणाऱ्या मेळघाटातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहचविल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीदेखील निर्माण केली जाते आहे. दरवर्षी प्रोजेक्‍ट बंधनच्या माध्यमातून राख्यांची विक्री केली जात आहे.

व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकत राखी बनविण्याचे किट उपलब्ध करून देण्यात आले. या किटद्वारे विद्यार्थ्यांना विविध शाळांना भेट देत राखी बनविण्याची कार्यशाळा घेण्यास सुरवात केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासदेखील बळावला. आज प्रोजेक्‍ट बंधन हा केवळ उपक्रमपुरता मर्यादित राहिला नसून, ही एक चळवळ बनली आहे. मविप्र संस्थेच्या ऍड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात एमबीएच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबत व्यावसायिकतेचे धडे गिरविण्यासाठी दरवर्षी असे विविध उपक्रम राबविण्यात येतोय. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News