पालकमंत्र्यांकडून दिशाचे कौतुक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

अकोला: दिशा अग्रवाल या अकोल्याच्या मुलीने संपूर्ण महाराष्ट्रातून मुलींमधून प्रथम येण्याचा मान पटकाविला. त्याअनुषंगाने अकोल्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवार (ता.१०) तिचे कौतुक करून सत्कार केला.

एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ५ मे रोजी झालेल्या नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स (नीट) परीक्षेत अकोल्याच्या दिशा समीर अग्रवाल हिने राज्यात मुलींमधून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ७२० गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत ६८५ गुण मिळवताना राष्ट्रीय स्तरावर (ऑल इंडिया रॅन्क) तिने ५२ वे स्थान पटकाविले. डॉ. पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कौतुक सोहळ्यास दिशाचे आई-वडील, आजी-आजोबा आणि गुरुजन उपस्थित होते. डॉ.पाटील यांनी दिशाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News