ऐकावं ते नवलचं ! एक खड्डयांची किंमत अँड्रॉईड स्मार्टफोन इतकी, पालिकेचा अजब कारभार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019
  • एक खड्डा १७ हजार रुपयांचा 
  • आठ हजार ८७९ खड्डे बुजविण्यासाठी १५ कोटी 

मुंबई : मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. गेल्या वर्षीसारखीच यंदाही रस्त्याची दुर्दशा झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दूरूस्ती होत नाही.

खडड्यांवर कोल्डमिक्‍सचा उतारा असला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. यंदाच्या पावसाळ्यात दोन हजार ६४८ खड्डे पडले असून त्यापैकी ४१४ खड्डे उरले आहेत. गेल्या दोन वर्षांत आठ हजार ८७९ खेड्डे बुजविण्यासाठी १५ कोटी ७१ लाख रुपये खर्च आला त्यामुळे एक खड्डा १७ हजार रुपयांना पडला असल्याची माहिती हाती आली आहे. 

मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही दरवर्षी रस्ते खड्डेमय होऊन नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते.

यंदा १० जून ते १ ऑगस्टपर्यंत रस्त्यांवरील २६४८, खड्डयांपैकी २३३४, खड्डे बुजवले असून फक्त ४१४ खड्डे बाकी आहेत, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. तसेच पालिकेने २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षात तब्बल ८८७९, खड्डे बुजविण्यासाठी १५ कोटी ७१लाख २९ हजार रुपये खर्च केले.  त्यामुळे एका खड्ड्यावर तब्बल १७ हजार रुपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. हे खड्डे बुजवण्यासाठीही कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. सन २०१३  ते ३१ जुलै २०१९ पर्यंत मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या एकूण २४१४६ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News