अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सीतारामन यांनी घेतली मनमोहनसिंग यांची भेट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019
  • अर्थसंकल्पावर चर्चा झाल्याचे मानले जाते

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला, तरी यात अर्थसंकल्पावर चर्चा झाल्याचे मानले जाते. 

भाजप आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प पाच जुलैला मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून कृषी, उद्योग यांसह वेगवेगळ्या क्षेत्रांच्या असलेल्या अपेक्षा अर्थमंत्री जाणून घेत आहेत. गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीदरम्यान राज्यांकडूनही अभिप्राय जाणून घेऊन केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, राज्यांना मिळणारा निधी यांसारख्या बाबींवर त्यांनी विचारविनिमय केला होता. निती आयोगाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनीही आर्थिक सूचना जाणून घेतल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर सीतारामन यांनी डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News