लाखोंच्‍या उपस्‍थितीत हरिनामाच्‍या गजरात परतवारीचा सोहळा

राजेश दारव्‍हेकर
Sunday, 28 July 2019

नर्सी नामदेव येथे संत नामदेवाच्या जयघोषणाने परिसर दुमदुमला

हिंगोली - तालुक्‍यातील संत नामदेवांचे जन्‍मस्‍थान असलेल्‍या नर्सी नामदेवमध्ये परतवारी सोहळ्यात रविवारी (ता.28) लाखो भाविकांनी सहभाग नोंदवला. विठ्ठल नामाच्या गजरात अनेक गावांमधून आलेल्‍या दिंडयाच्या गर्दीने नर्सीला जत्रेचे स्‍वरुप आले होते. सकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्‍ते महापुजा झाली. 

आषाढी वारीनंतर येणाऱ्या एकादशीला विठोबा संत नामदेवांच्‍या भेटीला येतात ही वारकरी परपंरा परतवारीच्‍या निमित्ताने जपली जाते. त्‍यासाठी हजारो वारकरी दाखल होतात. त्‍यासोबतच आषाढीला पंढरपूरला गेलेले वारकरी नर्सीला दर्शनासाठी येत असता. आज सकाळपासून परतवारीसाठी भाविकांनी नर्सीच्‍या दिशेने वाटचाल केली. दिंड्या व फड घेवून वारकरी कयाधूच्‍या वाळवंटात एकत्र आले होते. संपूर्ण रस्‍त्‍यावर गर्दी झाली होती. 

आज सकाळी सहा वाजता संत नामदेवांच्‍या मूर्तीची  महापूजा करण्यात आली. यावेळी रामेश्वर शिंदे, ओमप्रकाश हेडा, गिरीधारीलाल तोष्णीवाल, भिकाजी किर्तनकार, सुभाष हुले, नारायण खेडेकर, भागवत सोळंके, शाहुराव देशमुख, भिकाजी कदम, शिवाजी कऱ्हाळे, विठ्ठल बेले, गणेश शिंदे, गिरीष वरुडकर, दाजीबा पाटील, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे आदींची उपस्‍थिती होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News