आता तयारी ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ची

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019
  • बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार
  • आता लवकरच ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’
  • चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दाक्षिणात्य चित्रपटाचे खास आकर्षण असते ते म्हणजे ॲक्‍शन आणि थ्रिलर. ‘बाहुबली- द बिगिनिंग’, ‘बाहुबली २- द कंक्‍लूजन’, ‘मगाधिरा’सारखे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडले.

आता लवकरच ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ हा बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या सैनिकांवर आहे.

नुकताच या चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह चिरंजीवी, के. सुदीप, विजय सेतुपती, जगपतीबाबू, अभिनेत्री नयनतारा, तमन्ना आणि अनुष्का शेट्टी हे देखील आहेत. त्यामुळे आता हा व्हिडिओ पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News