गर्भवतींनो, ‘मस्त’ खा, तंदुरुस्त राहा..!

नेत्वा धुरी
Wednesday, 30 January 2019

     देशातील पन्नास टक्के महिलांना शरीरात लोहाची कमतरता आहे. हा एक प्रकारचा अशक्तपणा असला तरीही त्याला लोहाच्या कमतरतेचे कुपोषण असे संबोधले जाते. ही कमतरता असलेली महिला गर्भवती राहिली की अनेक समस्या उद्‌भवतात. दुर्दैवाने आपल्या देशात ॲनिमियामुळे मृत्यू पावलेल्या गर्भवती महिलांचे प्रमाण जास्त आहे. किंबहुना ॲनिमिया हेच गर्भवती महिलांच्या मृत्यूमागील प्रमुख कारण दिसून येत आहे. राष्ट्रीय आरोग्य योजनेत ॲनिमियाच्या निराकरणासाठी गर्भवती महिलांसाठी खास उपाययोजना असल्या तरीही याबाबतची संभ्रमता समाजात अधिक असल्याचे डॉक्‍टर बोलतात.

     गायनाकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या दाव्यानुसार, ॲनिमियावर मात करणे ही गर्भवती महिलांसाठी आव्हानात्मक बाब नाही. मुळात या आजाराबाबतचे गांभीर्य न ओळखणे हेच हा आजार वाढण्याचे कारण असल्याचे स्त्री-रोगतज्ज्ञ म्हणतात. शरीर निरोगी नसेल, तर गर्भधारणा, प्रसूती, नवजात शिशू या सर्व पातळ्यांवर वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. परंतु आपल्याकडे महिलांचे आरोग्य हाच मुळात दुर्लक्षिलेला विषय आहे. त्यामुळे गर्भवती महिलांबाबतची काळजी हा अपुऱ्या चर्चेत अडकून राहतो. यातूनच लोह, प्रथिने आदी घटकांची कमतरता असलेल्या महिलांना गर्भारपणात अनेक अडथळे उभे राहतात.

     मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय महिलांमध्ये घरातल्या सदस्यांनी टाकलेले अन्न, उरलेले अन्न खाण्याची सवय असते. अशा चुकीच्या खाण्याच्या सवयी; तसेच चुकीच्या जीवनपद्धती ॲनिमियाला आमंत्रण देत आहेत. त्याच गर्भारपणात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटले तर ॲनिमिया जास्तच बळकावतो. 

   स्त्री-रोगतज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, देशातील सत्तर टक्के गर्भवती महिलांना ॲनिमियाचा आजार आहे. परिणामी, गर्भपिशवीची वाढ न होणे, वेळेअगोदर प्रसूती होणे, कमी वजनाच्या बालकांचा जन्म आदी केसेस आता वाढू लागल्या आहेत. प्रसूतीनंतर कित्येकदा नवजात शिशूवरही त्याचा परिणाम होतो. मुलाला सातत्याने जुलाबाची लागण होऊन त्यातच त्याचा  मृत्यू होतो. मातेला प्रसूतीनंतर संसर्ग होत तिचाही मृत्यू होण्याची शक्‍यता असते. हे प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही गरजेचे आहे.

     हे प्रमाण आटोक्‍यात आणण्यासाठी मुळात आपले शरीर गर्भधारणेसाठी सुदृढ आहे का, याची तपासणी अगोदर महिलांनी करून घ्यावी. गर्भधारणेत मधुमेह, हायपरटेन्शन, थायरॉईड नियंत्रणात हवे. शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण संतुलित हवे. अन्यथा ॲनिमिया नियंत्रणात राहणे आव्हानात्मकच राहील.

ॲनिमिया होण्याची कारणे

  • चहा-कॉफीचे अतिरिक्त सेवन
  • लोहयुक्त अन्नपदार्थांचा अभाव
  • गर्भधारणेअगोदर स्त्री अशक्त असल्यास
  • कमी वयातील गर्भधारणा
  • दोन गर्भधारणेदरम्यान दोन वर्षांपेक्षा कमी अंतर असणे    

या अन्नपदार्थांचे सेवन करावे

  • पालेभाज्या
  • सुका मेवा
  • मटार, मसूर, सोयाबीन,
  • अन्नपदार्थांत मैदा टाळणे
  •  कोंबडी, मटण, मासे व्यवस्थित शिजवून खाणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News