पसंतीक्रमातील प्रवेश बंधनकारक अकरावी पहिल्या यादीतील प्रवेशाचा उद्या अखेरचा दिवस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाली. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता. १६) दुपारी ३ वाजेपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. या यादीत पहिला पसंतीक्रम मिळालेल्या ४८ हजार ८७२ विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे; अन्यथा असे विद्यार्थी पुढील होणाऱ्या फेरीतून बाद ठरणार असून त्यांचा विशेष फेरीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी एक लाख ८५ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी एक लाख ३४ हजार ४६७ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश देण्यात आला आहे; तर ५० हजार ८५१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत. राज्य मंडळाचा निकाल यंदा कमी झाल्यामुळे तसेच केंद्रीय विद्यार्थ्यांना ९० प्लस गुण असल्याने पहिल्या यादीत टक्केवारी वाढेल अशी शक्‍यता होती; मात्र गतवर्षीच्या तुलनेत कटऑफमध्ये फारसा परिणाम झालेला नाही. 

पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी १६ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्‍चित करून घ्यावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दोन ते १० पसंतीक्रम असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करावयाचा असेल त्यांनी विहित कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चित करून घ्यावा.

तसेच महाविद्यालयाचे पसंतीक्रम बदलवायचे असतील त्या विद्यार्थ्यांनी १७ व १८ जुलै रोजी आपले पसंतीक्रम बदलून त्याची छायांकित प्रत काढून ठेवावी. ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलवायचे नसतील, त्यांचे पूर्वीचेच पसंतीक्रम ग्राह्य धरून प्रवेश देण्यात येणार आहे.

कटऑफ ८० ते ८५ टक्‍केच
काही मोजक्‍याच महाविद्यालयांतील कटऑफ ९० ते ९२ टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. अनेक महाविद्यालयांतील कटऑफ ८० ते ८५ टक्‍क्‍यांवरच स्थिरावल्याचे दिसून येते. ८८ ते ८५ टक्के गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले नाही.

प्रवेशाचा कालावधी
पहिल्या यादीतील प्रवेश निश्‍चित करणे- १५ जुलै स. ११ ते सायं. ५ वा. आणि १६ जुलै स. ११ ते दु. ३ वाजेपर्यंत. रिक्त जागांचा तपशील व पहिल्या फेरीचा कट ऑफ जाहीर करणे- १६ जुलै, सायं. ७ वा
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News