प्रवीण तरडेचा नवा चित्रपट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या यशानंतर शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रवीणने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती.

अभिनेता प्रवीण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या यशानंतर शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रवीणने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि चित्रपटाचे नाव समोर आले आहे. 

‘सरसेनापती हंबीरराव’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. तसेच या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘तुटून पडला जरी हात, नाही सोडली तलवारीची साथ...’ असे लिहिले आहे. प्रीवणने स्वतः त्याच्या सोशल मीडियावर हे पहिले पोस्टर शेअर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. 

या चित्रपटात हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे असून हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News