युवकांच्या सतर्कतेमुळे राष्ट्रीय पक्षाचा वाचला प्राण

सुयोग घाटगे
Sunday, 21 July 2019

कोल्हापूर: टिम्बर मार्केट अग्निशमन दलाची गाडी तातडीने साळोखेनगर येथील बी.एस.एन.एल. ऑफिस मागे दाखल झाली. परिसरातील नागरिकांना काही कळण्याआधीच अग्निशमनच्या जवानांनी तातडीने हरकतीच्या येऊन जखमी अवस्थेतील मोराला गाडीत घेतले आणि या मोराला पुढील उपचासाठी घेऊन गेले. जबर जखमी अवस्तेत या मोरावर वनविभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले.
  

कोल्हापूर: टिम्बर मार्केट अग्निशमन दलाची गाडी तातडीने साळोखेनगर येथील बी.एस.एन.एल. ऑफिस मागे दाखल झाली. परिसरातील नागरिकांना काही कळण्याआधीच अग्निशमनच्या जवानांनी तातडीने हरकतीच्या येऊन जखमी अवस्थेतील मोराला गाडीत घेतले आणि या मोराला पुढील उपचासाठी घेऊन गेले. जबर जखमी अवस्तेत या मोरावर वनविभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले.
  
साळोखेनगर बीएसएनएल ऑफिस मागील बाजूस असणाऱ्या चंद्रकांत साळोखे यांच्या घराच्या समोरील मोकळ्या जागेत मोर जखमी अवस्तेत आढळून आला. झाडावरून पडल्यामुळे हा मोर जखमी झाला होता. या परिसरातच रहिवासी निखिल मोहिते, फायरमन संग्राम मोरे यांनी फायर स्टेशनला कळवले. तसे या ठिकाणी टिम्बर मार्केट फायर स्टेशन ची गाडी दाखल झाली. या मध्ये चालक चंद्रकांत पाटील, फायरमन प्रवीण भ्रमदंडे, आकाश माने यांनी गाडीच्या साहाय्याने या मोराला सुरवातीला पांजरपोळ येथील उपचार केंद्रात आणण्यात आले. 

मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे यावर इतर कोणीही उपचार करू शकत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या मोराला उपचारासाठी वनविभागाच्या दवाखान्यात दाखल केले. येथे पसशुवैद्यकीय अधिकारी यांनी मोराचा एक्सरे काढला त्या मध्ये मानेचे हाड सरकल्याने निदर्शनात आले. या जखमी मोराला मानेवर जखम देखील झाली होती. ही जखम मोठी आणि खोलवर होती. तसेच मानेला जोराचा मार बसल्यामुळे मानेचे हाड सरकले होते. या मुळे मोराला स्वतःच्या मानेचा भार सांभाळणे शक्य होत नव्हते. 

अशा अवस्थेत या मोराला वनविभाग कोल्हापूर सर्कलचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी प्राणी मित्र प्रशांत साठे यांच्या मदतीने उपचार केले. मानेचे हाड पुन्हा मूळ जागेवर आणण्यात आले तर मोरावर लघु शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळीच मिळालेल्या उपचारामुळे या मोराचे प्राण वाचले. अजूनही मोराला नीट चालता येत नसल्याकारणाने त्याला वनविभागाच्या वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News