गृहिणींनो मेथी-पालक पकोडे असे बनवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 July 2019

साहित्य : मेथीची कोवळी पाने एक वाटी, पालकाची पाने एक वाटी, रवा अर्धा वाटी, बेसन एक वाटी, हिरवी मिरची वाटण एक मोठा चमचा, एक चमचा खसखस, एक चमचा तीळ, अर्धा चमचा चिंचेची चटणी, एक चमचा धणेजीरा पावडर, अर्धा टीस्पून खायचा सोडा, एक चमचा ओवा, हळद, हिंग, तेल, अर्धा चमचा मीठ.

कृती - मेथी, पालक बारीक चिरून घ्या. यात बेसन, रवा, मीठ मिक्‍स करून पंधरा मिनिटे ठेवा. यात हिरवी मिरची, खसखस, तीळ, चिंचेची चटणी, धणेजीरा पावडर, खायचा सोडा, ओवा, हळद, हिंग घालून सर्व एकत्र करा. आवश्‍यकतेनुसार पाणी वापरा. पीठ फारसे पातळ नको. गरम तेलात हे पकोडे कुरकुरीत तळून घ्या. टोमॅटो सॉससह सर्व्ह करा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News