झांसी स्पेशलचा बटाट्याचा रस्सा तुम्ही असा बनवा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

एका कढईत तेल तापवुन, हिंग मोहरी चि फोडणी करुन त्यात उकडलेल्या बटाटाच्या चौकोनी फोडी किंचीत खरपुस कराव्यात.

लागणारे साहित्य: 
४ मध्यम बटाटे उकडुन, साले काढुन, चौकोनी फोडी करुन
१ जरा मोठा बटाटा उकडुन, साले काढुन, कुस्करुन. हातानेच साधारण बारीक कुस्करुन थोडे पाणी घालुन सरसरीत करावा.
धणे-जिरे पुड, लाल तिखट, मीठ – चवीनुसार

क्रमवार पाककृती: 
एका कढईत तेल तापवुन, हिंग मोहरी चि फोडणी करुन त्यात उकडलेल्या बटाटाच्या चौकोनी फोडी किंचीत खरपुस कराव्यात. आता त्यात धणे-जिरे पुड, लाल तिखट, मीठ, साखर – चवीनुसार घालुन आधी लिहिलेला कुस्करलेला बटाटा आणी साधारण पाउण वाटी पाणी घालावे. भाजी व्यवस्थित उकळावी, त्या वेळेस पाणी बर्यापैकी आटते. हवे असल्यास अजुन थोडे पाणी घालावे. कोथीबीर घालुन बंद करावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News