बिकनी फोटो पोस्ट केल्याने महिला डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द; जगभरात चर्चा सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

काही दिवसांपूर्वीच डॉक्टर नांग हिने आपला बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यामुळेच म्यानमारमधील वैद्यकीय परिषद तिच्यावर खूपच संतापली. सुरुवातीला वैद्यकीय परिषदेने तिला नोटीस पाठवली. त्यानंतर तिचा डॉक्टरकीचा परवानाही रद्द केला. याचा सरळ अर्थ असा आहे की, यापुढे ती म्यानमारमध्ये प्रॅक्टिस करु शकत नाही. 

म्यानमार: सोशल मीडियावर आपण काय करतो हे आपल्या मित्रमंडळींना कळवण्यासाठी अनेकदा बरेच फोटोही आपण शेअर करत असतो. एका महिला डॉक्टरने सोशल मीडियावर बिकनीवरील फोटो शेअर केल्यामुळे डॉक्टरकीचा परवाना गमवावा लागला आहे. म्यानमारच्या या महिलेचं नाव नांग मी सान असं आहे. 

काही दिवसांपूर्वीच डॉक्टर नांग हिने आपला बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यामुळेच म्यानमारमधील वैद्यकीय परिषद तिच्यावर खूपच संतापली. सुरुवातीला वैद्यकीय परिषदेने तिला नोटीस पाठवली. त्यानंतर तिचा डॉक्टरकीचा परवानाही रद्द केला. याचा सरळ अर्थ असा आहे की, यापुढे ती म्यानमारमध्ये प्रॅक्टिस करु शकत नाही. 

हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्रावर घाला असल्याचं म्हणत डॉक्टर नांग सान हिने आपला परवाना परत मिळावा यासाठी वैद्यकीय परिषदेचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणत त्याला जोरदार विरोधही केला आहे.  वैद्यकीय परिषदेकडून असे फोटो हे देशाच्या संस्कृतीविरोधात असल्याचे नोटीसमध्ये नमूद करून यासाठीच तिचा परवाना रद्द करण्यात आला आहे. <

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

wanna be tan 

A post shared by Nang Mwe San (@nangmwesan) on

>

स्थानिक मीडिया माध्यमांच्या रिपोर्टनुसार डॉक्टर नांग सान असंही सांगितलं की, 'मेडिकल प्रॅक्टिसदरम्यान मी कधीही छोटे कपडे परिधान केलेले नाहीत. 'मी रुग्णांना कधीही अशा कपड्यांमध्ये भेटत नाही. त्यामुळे हा निर्णय खरंच धक्कादायक आहे.' असं म्हणत नांग हिने आपला संताप व्यक्त केला आहे.<

>

नांग सानला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर बिकनीमधील अनेक फोटो शेअर करत असते. तिने असं करू नये असं तिला वारंवार सांगण्यात आलं होतं. पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत तिने आपले बोल्ड फोटो पोस्ट करणं सुरूच ठेवलं होतं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News