समाजकार्य पदव्युत्तर विद्यार्थ्यांना बेंचमार्क सर्व्हेचे मिळणार वाढीव गुण 

सुशांत ज. कांबळे, जनसंपर्क अधिकारी
Friday, 9 August 2019
  • आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अनुसूचित जमातीचा बेंचमार्क सर्व्हे कार्यवाही बाबत आढावा बैठक
  • समाज कार्य विषयात पदव्युत्त्तर शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचे निर्देश

मुंबई: सर्वेक्षणात अन्वेषक (इन्वेस्टिगेटर) म्हणून काम करणाऱ्या समाज कार्य विषयात पदव्युत्त्तर शिक्षण पूर्ण झालेल्या (मास्टर्स इन सोशल वर्क) विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाला वाढीव गुण देण्यात यावे असे निर्देश राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिली.

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अनुसूचित जमातीचा बेंचमार्क सर्व्हे कार्यवाही बाबत आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. अनुसूचित क्षेत्राचा विकास ही शासनाची महत्त्वाची व प्राथम्याची बाब आहे. हे सर्वेक्षण बेंच मार्क अनेक वर्ष करत आहेत. या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या सूचनेवरून पुणे येथील आदिवासी व प्रशिक्षण संस्थेकडून १९७८-८० साली पहिला बेंच मार्क सर्व्हे पूर्ण करण्यात आला होता.

त्यानंतर १९९६- ९७ साली नंतरचा बेंच मार्क सर्व्हे घेण्यात आला होता. मागील सर्व्हेक्षणास तेवीस वर्षांचा कालावधी झाला असल्यामुळे आता सद्यस्थितीतील आदिवासींच्या विकासाचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे गरजेचे आहे.

 या सर्वेक्षणासाठी एकूण 12 लाख 60 हजार कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाईल यामध्ये माहिती संकलित करण्यासाठी एकूण १२,०० अन्वेषक आवश्यक असतील. तसेच प्रत्येक १० अन्वेषकामागे १ मार्गदर्शक उपलब्ध करण्यात येईल.

या सर्वेक्षणासाठी साधारण ६ महिने इतका कालावधी लागणार असून माहिती सर्वेक्षणासाठी गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाययक, एएनएम,शाळेचे मुख्याध्यापक, स्थानिक पोलीस यंत्रणा व आरोग्यसेवेतील डॉक्टरांची मदत घेण्यात येईल.

या सर्वेक्षणाचा उद्देश आदिवासी जमातींच्या विकासचे नियोजन करणे, सांख्यिकी माहिती तयार करणे, आदिवासी जमातींच्या आर्थिक आणि सामाजिक सद्यस्थितीचा अभ्यास करणे, योजनांचे मॅपिंग करणे तसेच आदिवासी गावे आणि पाडे येथील भौतिक सुविधांचा अभ्यास करून संसाधन वितरण करण्यासाठी आदिवासी क्षेत्रे निश्चित करणे आहे.

हे सर्वेक्षण सध्यस्थीतील अनुसूचित क्षेत्रात केले जाणार असून जनगणना स्वरूपाचे असेल. या बैठकीत आदिवासी विकास विभागाचे उप सचिव डोळे, कक्षधिकारी सतीश कोरे, संतोष जाधव, सुनील पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News