उस्मानाबाद केंद्राची पदव्युत्तर सीईटी पाच जुलैला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात गणित, भौतिकशास्त्र आणि नाट्यशास्त्र हे यावर्षी नव्याने सुरु
  • एम. एस्सी गणित, एम. ए. नाट्यशास्त्र व लोककला, एम. एस्सी. भौतिकशास्त्र या विभागांचे सीईटीचे शेड्युल तयार झाले

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात गणित, भौतिकशास्त्र आणि नाट्यशास्त्र हे यावर्षी नव्याने सुरु झालेल्या विभागांच्या पदव्युत्तर पदवीची सीईटी पाच जुलैला होणार आहे. 

एम. एस्सी गणित, एम. ए. नाट्यशास्त्र व लोककला, एम. एस्सी. भौतिकशास्त्र या विभागांचे सीईटीचे शेड्युल तयार झाले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याला आज सुरु झाली असून 29 जुन पर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्जाची हार्डकॉपी 2 जुलैपर्यंत संबंधित विभागात जमा करायची आहे. 

पदव्युत्तरची सीईटी पाच जुलैला होणार आहे. तर निकाल 8 जुलैला लावण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेचे फेरीनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत. अधिसभा सदस्य डॉ. गोविंद काळे, डॉ. एस. एस. फुलसागर, डॉ. मिलिंद माने या अभ्यासक्रमाचे समन्वयक आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन संचालक डॉ. अनार साळुंके, उपकुलसचिव आय. आर. मंझा यांनी केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News