अनुसूचित जमातीतून पूनम गेडाम राज्यात अव्वल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोग: महिला व बालविकास अधिकारी परीक्षा

बल्लारपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माहिला व बालविकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून बल्लारपूर शहरातील पूनम रमेश गेडाम राज्यात अव्वल ठरली आहे.  

स्पर्धा परीक्षेसाठी मागील दोन वर्षांपासून तयारी करीत होती. या आधी पूनमने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन परीक्षा दिल्या. मात्र निम्मा फरकाने ती मागे पडली. मात्र पुन्हा जिद्दीने प्रयत्न केले आणि महिला व बालकल्याण परीक्षेत ती नुसती उत्तीर्णच नाहीतर अनुसूचित जमाती प्रवर्गातून तिने राज्यात प्रथम आली.
 
पूनमने आपले ९ वी १२ पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय येथून पूर्ण केले. तिचे बीएससीची पदवी  गुरुनानक विद्यालय बल्लारपूर येथून घेतली. पुढे तिने याच विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या  तयारीसाठी पूनमने पुणे शहर गाठले. याआधी तिला दोनदा अपयशाचा सामना करावा लागला. यावेळी तिला यश मिळाले.  

पूनमने यशाचे श्रेय आई वडील आणि शिक्षकांना दिले आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल समाजातील विविध स्तरावरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पूनम बल्लारपूर शहरातील भगतसिंग वॉर्डातील रहिवासी आहे. वडील वेकोली येथे सुरक्षा रक्षक आहे. बहीण जयश्री एमबीबीएस झाली असून ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे कार्यरत आहे.भाऊ अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. आई गृहिणी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News