मतदानपर्व

माधव जाधव, कंधार 
Monday, 1 April 2019

आहला भारत या विशाल लोकशाही प्रधान देशाचे सूज्ञ नागरिक आहोत. आपली लोकशाही सक्षम, सुदृढ, लोकाभिमूख व निकोप व्हावी, हे सर्वांनाच वाटते. भारतात सार्वत्रिक निवडणुकीचा उत्सव चालू आहे. मतदान करण चुकल तर पाच वर्ष देशाला शिक्षा व्हायला नको. म्हणून 'शंभर टक्के मतदान, डोळस मतदान' ही काळाची गरज आहे. मतदान का? कोणाला? कशासाठी? किती द्यावे? या अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक, कवी माधव जाधव यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून 'मतदानपर्व' लोकप्रशिक्षणार्थ हे गीत.
 

दानातदान महादान
डोळस मतदान करू
शंभर टक्के मतदान करून
लोकशाही मजबूत करू ll धृ ll

राजेशाही हो जुल्मी सत्ता
हुकूमशाहीची वेगळीच कथा
दुःखी कष्टी होती हो जनता
सुख स्मृद्धीचा नव्हता पत्ता
आपणच राजे आणि महाराजे
राज्य आपलेच आपण करू  ll१ll

कोणी गरीब असो वा श्रीमंत 
सगळ्या मतांची एकच किंमत
संविधानान दिलया दान
कॉमन मॅनही बनालाय महान
मताची किंमत, दावतिया गंमत
विकासाची कास आता धरू ll २ ll

पाच वर्षाला येतोया मोका
मत विकून देऊ नका धोका
संधी चालून आलीया बाका
देशी गद्दारांना मतातून ठोका
निस्वार्थ मतदान,देशाला योगदान
सत्त्य मेव जयते करू ll ३ ll...

आराम करीत राहू नका लोळंत
मता मतावर नजर ठेवा पाळंत
आळंस बनेल आपलाच वैरी
 निवडून जाईल कोणी ही गैरी
आपलीच कु-हाड ,आपलाच पाय
घाव नका  धोक्यानं मारू ll४ ll.

तरूण म्हातारे चला हो सारे
सगळे दिव्यांग सोबत घ्या रे
राष्ट्र भक्तीचे  वाहू द्या वारे  
संविधानाचे पाईक व्हा रे
निवडणूकपर्व भारताला गर्व
सण राष्ट्रीय साजरा करू ll ५ ll...
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News