शिक्षण पद्धतीमध्ये आता राजकारणचा समावेश होणार

शुभम संचेती
Wednesday, 12 June 2019

शिक्षण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो विद्यार्थी आणि शिक्षक, परंतु हल्ली शिक्षणाची व्याख्या बदलत चालली आहे. शिक्षणामध्ये शिकणे आणि शिकवणे इतकेच मर्यादित राहिले नसून त्यात मोठ्या प्रमाणावर सरकारचा हस्तक्षेप वाढताना दिसून येतो.

शिक्षण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो विद्यार्थी आणि शिक्षक, परंतु हल्ली शिक्षणाची व्याख्या बदलत चालली आहे. शिक्षणामध्ये शिकणे आणि शिकवणे इतकेच मर्यादित राहिले नसून त्यात मोठ्या प्रमाणावर सरकारचा हस्तक्षेप वाढताना दिसून येतो. आणि यातूनच शिक्षणामध्ये राजकारण दिसून येते. अनेक प्रश्न पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्याही डोळ्यासमोर असतात आणि या प्रश्नांची उकल जून महिना जसा जसा जवळ येतो तशी तशी होते.

याचेच उदाहरण मेडिकलच्या प्रवेशांमध्ये आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाचा असलेला मुद्दा, फी वाढ, शिक्षक भरती यासारखे मुद्दे दरवर्षी प्रकर्षाने जाणवतात परंतु यावर म्हणावा तसा तोडगा निघतांना दिसत नाही कि ते मुद्दामहून राजकारण्यांची पोळी भाजावी या हेतूने दुर्लक्षित केले जातात?

देशातील शिक्षणाची परिस्थिती बघता मानव विकास निर्देशांक 2018 च्या नुसार जागतिक स्तरावर भारताचा 189 देशांच्या यादीत 130 वा क्रमांक लागतो. यातून देशाची असलेली परिस्थिती आपणास दिसून येते. देशाची ओळख तरुणांचा देश अशी असतांना तरुणांना योग्य ते शिक्षण मिळते का?

शिक्षण हे फक्त पैसा कमावण्याचे माध्यम इतकेच मर्यादित राहिलेले आहे. आज अनेक शिक्षण क्षेत्रातील तज्ञ सांगतात की देशातील शिक्षण व्यवस्था ही अत्यंत मागासलेल्या पद्धतीचे आहे आणि त्यात थोडे बदल करून ती नव्याने मांडण्याचा अट्टाहास राजकारण्यांनी घेतलेला आहे.

यातून कदाचित ते स्वतःची जबाबदारी टाळतही असतील, परंतु ज्यांच्यासाठी हा अट्टहास चालू आहे त्यांना काही खरच मिळते का? देशात शिक्षणासोबत राजकीय हेतूने अनेक योजनाही राबवल्या जातात. त्यात रोजगार मेळावे, विविध प्रशिक्षण कार्यशाळा, व्यवसायाभिमुख शिक्षण इत्यादी. परंतु त्यातून शिक्षणाचा स्तर, रोजगाराचा स्तर आणि एकंदरीत राहणीमानाचा दर्जा खरंच उंचावतो का? हे तपासणारी यंत्रणा अस्तित्वात आहे का?

हेही बघायला हवे आधुनिक काळात शिक्षण हे विद्यार्थी आणि शिक्षक इतकेच मर्यादित राहिले नसून त्यात सरकारच्या, राजकारण्यांच्या ध्येयधोरणांचा मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. शिक्षणावरती कोटी रुपये खर्च करूनही हा दर्जा उंचावता येत नसेल तर मग याला जबाबदार कोण? शिक्षक-विद्यार्थी,अभ्यासक्रम की राजकारण्यांचे उदासीन शैक्षणिक धोरण?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News