राजकारण

मनीषा काटे (भोसले) 
Friday, 25 January 2019

राजकारणाबद्दल मत
आज राजकारणाला फारस कोणी चांगल मनत नाही. कारण त्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. काम करत असताना फार कमी लोक आम्हाला राजकारण चांगल आहे हे सांगतात; पण तस अजिबात नाही. ज्याला अनेक कारण असतात, ते म्हणजे राजकारण असे मी मानते. राजकारण बद्दल माझा अनुभव फार चांगला आहे. कारण अगदी सामान्य घरातील, मी एक सावकार ग्रस्त शेतकर्‍याची मुलगी आहे. मात्र मला पक्षाने संधी असून, मी चांगल्याप्रमाणे काम देखील करत आहे. जनतेचे सुख, सुविधा, विकास या गोष्टीला प्राधान्याने देणे म्हणजे राजकारण होय.
राजकारणात आलेले अनुभव

माझे राजकारणातील अनुभव तसे चांगले आहेत. खूप कमी वयात मला विदर्भ अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये करायची तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत उतरण्याची संधी मिळाली.
पक्षाबद्दल मत
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2009 पासून सक्रिय आहे. फुले शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. यशवंत चव्हाण यांच्या विचारांवर चालणारे शरद पवार साहेब यांचे नेतृत्व पक्षाकडे आहे. आज वयाच्या 78 व्या वर्षीसुद्धा ते जोमाने काम करतात. आज सर्वांनासोबत घेऊन चालणारा नेता, शेतकर्‍यांच हित जोपासणारा व महिला, तरुण, बेरोजगार, सामान्य माणसाला न्याय देणारा नेता आज पक्षाकडे आहे
राजकारणात सक्रिय
मी यानंतरही राजकारणात सक्रिय असणार आहे. मला आवड आहे. आणि विश्वासाने सांगते, भविष्यात चांगल्या ठिकाणी मी तुम्हाला दिसेन.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News