राजकारण

अंकुश गणपतराव डोळे
Thursday, 24 January 2019

राजकारणाबद्दल मत -   विविध क्षेत्रात काम करणार्‍या लोकांनी राजकारणात आले पाहिजे. देशाला पुढे नेण्याची क्षमता राजकारणात आहे. राजकारणात यायचे म्हटले की, आपण आपलेच विचार सांगायला लागतो. राजकारण म्हणजे फक्त पैसे वाल्यांचकाम, तेच करू शकतात. असं काही तरी मत सांगून मोकळे होतात. पण अस नाही. मी राजकारणात राज करणारे पाहिले आणि आपली छाप सोडणारे ही पाहिले. काही  नेत्यांच्या बाबतीत सांगायचं झाल तर ते स्वतःला वाहून टाकतात. समाज सेवेत आणि काही काहीचे यांच्या उलट असते. मात्र, आपण चांगल्या नेत्याकडे पाहून राजकारणात सक्रिय राहिले पाहिजे. या क्षेत्रामुळे आपल्याला जनतेची सेवा करता येईल.

राजकारणाबद्दल मत -   विविध क्षेत्रात काम करणार्‍या लोकांनी राजकारणात आले पाहिजे. देशाला पुढे नेण्याची क्षमता राजकारणात आहे. राजकारणात यायचे म्हटले की, आपण आपलेच विचार सांगायला लागतो. राजकारण म्हणजे फक्त पैसे वाल्यांचकाम, तेच करू शकतात. असं काही तरी मत सांगून मोकळे होतात. पण अस नाही. मी राजकारणात राज करणारे पाहिले आणि आपली छाप सोडणारे ही पाहिले. काही  नेत्यांच्या बाबतीत सांगायचं झाल तर ते स्वतःला वाहून टाकतात. समाज सेवेत आणि काही काहीचे यांच्या उलट असते. मात्र, आपण चांगल्या नेत्याकडे पाहून राजकारणात सक्रिय राहिले पाहिजे. या क्षेत्रामुळे आपल्याला जनतेची सेवा करता येईल.

राजकारणात आलेले अनुभव 

मी 2011 साली राजकारणात प्रवेश केला,सुरुवातील मला बरेच अनुभव आले. कारण मी राजकीय घराण्यातून आलो नाही, पण या क्षेत्रात आल्यानंतर मला कळले की, अनेकांच्या काय समस्या असतात. या क्षेत्रात जनतेच्या सेवेसाठी आल्याने मला काही चांगलेदेखील अनूभव आले आहेत.  मी तेच समोर ठेवून राजकारणात सक्रिय झालो आहे, यामुळे लोकांची आपुलकी वाटू लागली.लोक आपल्याला समजून कामे सांगू लागले. पण बरेच चांगले आणि बरेच वाईट अनुभवही मला या क्षेत्रात आले आहेत. 

पक्षाबद्दल मत 

मागील काही वर्षापासून भारतीय जनता पक्षात सक्रिय आहे. हा पक्ष म्हणजे सर्व सामान्य कार्यकर्त्याला ओळख निर्माण करून देणारा पक्ष आहे. तसेच आज या पक्षाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या सारख्या सक्षम नेत्याकडे आहे. त्यांनी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वांचा विकास करण्याच्या उद्देशाने अनेक निर्णय घेतले. तसेच या पक्षात घराणेशाही नाही. मी ग्रामीण भागातून आलो आहे.तरी देखील मला पक्षाने संधी देवून एक वेगळी ओळख दिली आहे. 

सक्रिय

मी सध्या जिल्हा सरचिटणीस म्हणून काम आहे. यापुढेही मी राजकारणात सक्रिय राहाणार असून, जनतेची सेवा करणार आहे.

विद्यार्थी संघटना

1) युवा परिवर्तन मंच 
युवा परिवर्तन मंचाची स्थापना युवकांच्या हितासाठी करण्यात आली आहे. हा मंच मागील पाच ते सात वर्षापासून जिल्ह्यात सक्रिय आहे. युवकांचे महाविद्यालयीन प्रश्‍न, प्रवेश घेताना येणार्‍या अडचणी, युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, तसेच विविध समाजाविषयी उपक्रम युवा परिवर्तन मंचामार्फत राबविण्यात येते. हा मंच जिल्ह्यात यवतमाळ, वणी,घाटंजी या ठिकाणी कार्यरत आहे. यामध्ये 70 विद्यार्थी कार्यरत आहे. रितेश बोबडे यांच्यासह सदस्य म्हणून अविनाश गोटफोडे, शेखर सरकटे, समीर जाधव,शुभम इंगळे, जगदीश पवार, कृष्णा लडके आदी सदस्य आहेत.  युवा मंचाच्या वतीने 17 सप्टेंबर 2017 रोजी 'भविष्य उद्याचे' 'मुलींची सुरक्षा व सतर्कता' या विषयावर पी. वाधवानी कॉलेज फार्मसी महाविद्यालय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान आजच्या काळात युवतींना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.मुलींना कामानिमित्त,शिक्षणाकरिता बाहेर पडावे लागते, स्वतःचे संरक्षण स्वतःच करावे लागते. प्रत्येक महाविद्यालयात युवती सक्षम झाली पाहिजे या उद्देशाने युवा परिवर्तन मंचातर्फे कार्यशाळा घेण्यात येते. त्याचबरोबर गरजू विद्यार्थांना युवा परिवर्तन मंचमार्फत पुस्तकांचे देखील वाटप केल्या जाते. 23 जून 2017रोजी युवा मंचमार्फत विद्यार्थांना काही तक्रारी असल्यास त्याचप्रमाणे महाविद्यालयात विद्यार्थासंदर्भात भोंगळ कारभार असल्यास संपर्क करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. याकरिता त्यांनी महाविद्यालयात तसे पत्र देखील लावले आहे. तसेच (2017) मध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी सेतू केंद्रातून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया वेळी वेळेवर कागदपत्र मिळत नसल्याने तीव्र आंदोलन देखील करण्यात आले, त्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेऊन विद्यार्थ्यांना तात्काळ कागदपत्र मिळावे याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली होती. युवा परिवर्तन मंचातर्फे 16 फेब्रुवारील 2017 रोजी स्पर्धा परीक्षा मागदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून येजुर्वेन्द्र महाजन उपस्थित होते. या कार्यशाळेला यवतमाळमधील युवक व युवतींचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला. तसेच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी घेण्यात यावी, अशी देखील युवा मंचामार्फत मागणी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा दारू बंदीसाठी युवा परिवर्तन मंचातर्फे तरुणांमध्ये जाऊन जनजागृती अभियान देखील राबविण्यात आले आहे. स्वच्छता अभियान तसेच इतर विविध सामाजिक कार्य युवा परिवर्तन मंचामार्फत राबविण्यात येतात. तसेच सदस्यांच्या वाढदिवसाच्या पैशातून घाटंजी येथील मुकबधीर विद्यालयात खाऊचे वाटप करण्यात आले. युवा परिवर्तन मंचची सदस्या असलेली मुलगी तृप्ती दरेकर हिने सामाजिक बांधीलकी आणि माणुसकी जोपासत आपल्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या पैशातून घाटंजी येथील समर्थ मुकबधीर शाळेत खाऊ वाटप करून तरुण पिढीला एक नवी दिशा दाखवली आहे.

2) अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद
 जिल्ह्यात अखिल भारतीय आदिवासी युवा परिषदेची स्थापना विद्यार्थांच्या विविध प्रश्‍नावर योग्य तोडगा काढण्यात यावा. यासाठी करण्यात आली आहे. या युवा परिषदेत जिल्हाध्यक्ष सुनील ढाले आहे. तसेच या युवा परिषदेत जवळपास शंभर विद्यार्थी कार्यरत आहे. युवा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. यवतमाळमधील नवीन 500 मुलांचे व 250 मुलींचे आदिवासी वसतिगृह, विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासाठी अनेक अडचणी विद्यार्थ्यांना येत असल्याने भव्य मोर्चा काढून विद्यार्थ्याचा प्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दैनंदिन सोयीसुविधा चांगल्या मिळाव्यात यासाठी प्रकल्प अधिकार्‍यांकडे वारंवार पाठपुरावा.आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे वर्ग घेण्याकरिता अप्पर आयुक्ताकडून विशेष तरतूद करून घेतली. वसतिगृहातील जेवणाचा दर्जा सुधारवण्याकरिता प्रती विद्यार्थी जास्त भोजनाचे दर करून घेतले. जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळेमधील जाऊन त्यांच्याशी हितगूज साधून अडचणीवर व गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन केले.जिल्ह्यातील शासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध करू द्या,या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनाचा मार्ग स्वीकारून जिल्हाधिकारी यांना जमीन देण्यास भाग पाडले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News