या नेत्यांचे राष्ट्रवादीला 'रामराम' करण्याचे कारण काय ? कोणी सोडला पक्ष ....

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती
  • गळती अधिकच वाढण्याचे संकेत
  • दहा आमदार अखेरचा रामराम करणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढण्याचे संकेत असून सुमारे दहा आमदार लवकरच पक्षाला अखेरचा रामराम करणार आहेत. यांच्यासोबत पक्षातील अनेक नेते व पदाधिकारीदेखील भाजप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाची कटकट वाढणार हे निश्‍चित आहे. 

आतापर्यंत राष्ट्रवादी सोडलेले नेते ...
आमदार जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील, सुरेश धस, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, प्रसाद लाड, लक्ष्मण जगताप, बाबासाहेब देशमुख, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, संजय सावकारे, लक्ष्मण ढोबळे, विनय कोरे, सचिन अहिर, कपिल पाटील, किसन कथोरे, राहुल कूल, निवेदिता माने, शिवाजी कर्डिले.

.. यासाठी सोडताहेत पक्ष
दिलीप सोपल : स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव
बबन शिंदे : साखर कारखानदारीला अभय मिळावे म्हणून
संग्राम जगताप : पोलिस चौकशीचा ससेमिरा, विजयाची खात्री नाही
अवधुत तटकरे : चुलते सुनील तटकरे यांच्याशी राजकीय स्पर्धा 
राणाजगजितसिंह पाटील : शैक्षणिक संस्था व मेडिकल कॉलेजसाठी
वैभव पिचड : सत्तेत मंत्रीपदाचे आश्‍वासन 
संग्राम जगताप : विजयाची खात्री नाही
संदीप नाईक : स्थानिक मतदारसंघात युतीचा वाढता प्रभाव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News