राजकारण हे चेंज घडवून आणणारे क्षेत्र

प्रेरणा होनराव 
Saturday, 26 January 2019

राजकारणातील महिलांना पुढे येऊ दिले जात नाही, त्यांना राजकारणात पुरेसे स्थान नाही, त्यांना मिळणारी पदेसुद्धा नावापुरतीच असतात... अशा अनेक गोष्टी राजकारणात येण्याआधी माझ्या कानावर पडल्या होत्या. तरीसुद्धा मी राजकारण येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मला कळले की कानावर पडलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष मिळालेले अनुभव हे वेगवेगळे आहेत. ऐकिवात आलेल्या गोष्टींना मला कधीही फेस करावे लागले नाही. खरंतर बाहेरून आपण ज्या पद्धतीने या क्षेत्राकडे पाहतो, तसे हे क्षेत्र अजिबात नाही, हे मला या क्षेत्रात आल्यानंतर, पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आल्यानंतर कळत गेले.

राजकारणातील महिलांना पुढे येऊ दिले जात नाही, त्यांना राजकारणात पुरेसे स्थान नाही, त्यांना मिळणारी पदेसुद्धा नावापुरतीच असतात... अशा अनेक गोष्टी राजकारणात येण्याआधी माझ्या कानावर पडल्या होत्या. तरीसुद्धा मी राजकारण येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मला कळले की कानावर पडलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष मिळालेले अनुभव हे वेगवेगळे आहेत. ऐकिवात आलेल्या गोष्टींना मला कधीही फेस करावे लागले नाही. खरंतर बाहेरून आपण ज्या पद्धतीने या क्षेत्राकडे पाहतो, तसे हे क्षेत्र अजिबात नाही, हे मला या क्षेत्रात आल्यानंतर, पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आल्यानंतर कळत गेले. त्यामुळे या क्षेत्रातील महिलांना डावलले जाते, यावर माझा अजिबात विश्वास नाही. कुटूंबातूनही मला पूर्ण पाठींबा मिळाला. त्यामुळे या क्षेत्रातच करिअर करण्याचा आत्मविश्वास माझ्यात वाढला.

राजकारण हे चेंज घडवून आणणारे क्षेत्र आहे. त्यामुळे तरुणांनी या क्षेत्राचा स्वत: एक भाग व्हायला हवे. त्यातच खरी मजा आहे. हे क्षेत्र पुरूषप्रधान क्षेत्र समजले जाते आणि सध्याच्या काळात आहे ही. त्यामुळे या क्षेत्रात वावरताना आपल्या पारंपारिक संस्कृतीनूसार महिलांवर नक्कीच काही बंधने येतात. दररोज शेकडो लोकांना भेटावे लागते. त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. राज्यभर फिरावे लागते. अशावेळी सामान्य कुटूंबातून येणाऱ्यांना काही अडचणी येतात. त्यावर मात करता आली पाहिजे. तशी मात करत तरुणाईशी कनेक्ट होणारे स्कील डेव्हलपमेंटसारखे वेगवेगळे उपक्रम मला घेता आले. वेगवेगळ्या मोहिमा राबवता आल्या.
 
तरुणींना या क्षेत्रात आल्यानंतर नक्कीच वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात. नवनव्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यांनी या क्षेत्रात यावे. इतर क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रातही भरपूर संधी, प्रचंड वाव आहे. हे आपण ओळखायला हवे. ते कोणीतरी येऊन आपल्याला सांगणार नाही. सध्या बऱ्याच भागात निवडून आलेल्या महिलांचे पती, त्यांचे वडिल किंवा दीर हेच पदे भूषवित असतात. हे प्रमाण जास्त असले तरी राजकीय पार्श्र्वभूमी नसलेल्या तरुणी नवे व्हिजन घेऊन सध्या या क्षेत्रात येत आहेत. हळुहळू होत चाललेला हा बदल आपला भविष्यकाळ अधिक चांगला बनवेल, असेच वाटते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News