VIDEO-आमदाराच्या भावाने महिला अधिकारीआणि पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; VIDEO व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

तेलंगणा : मध्य प्रदेशातल्या आमदाराची गुंडगिरी देशानं पाहिली. आता तेलंगणातही आमदाराच्या भावानं एका महिला अधिकाऱ्यावर काठीनं हल्ला करून जखमी केलं आहे. या घटनेचा बघ्यांनी काढलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदाराचा भाऊ आणि जमावाने घातलेला धुडगूस यापुढे वनखात्याचे अधिकारीदेखील हतबल झाले. 

टीआरएसचे आमदार कोनेरु कोनप्पा यांच्या भावानं महिला वन अधिकाऱ्यावर हल्ला केला. सी. अनिता असं पीडित अधिकाऱ्याचं नाव आहे. अनिता यांच्या डोक्यावर काठीचे अनेक वार झाले. सुदैवानं त्यांच्या प्रकृतीला धोका नाही. मात्र आमदाराचे भाऊ कोनेरू कृष्ण राव याला या प्रकरणी अजून अटक झाली नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News