हिंदुत्ववादी नेत्या साध्वी यांना पोलिसांनी रोखले रस्त्यात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • साध्वी प्राची यांना तप्पल येथे जाण्यापासून पोलिसांनी रोखले

अलिगड : तप्पल येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने देशात संतापाची लाट उसळली असून, आज हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्राची यांच्या ताफ्यास तप्पलच्या सीमेवर रोखण्यात आले. तप्पल परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता साध्वी प्राची यांना तप्पल येथे जाण्यापासून रोखल्याचे पोलिसांनी सांगितले.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी आंदोलन होत असून काल दोषींचे प्रतीकात्मक पुतळेही जाळण्यात आले. या वेळी पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News