पोलिसाने केले शासकीय जागेवर अतिक्रमण; हटवण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांस मारहान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीत मोदुमडगु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच्या जागेवरचे अतिक्रमण करण्यात आले होते.
  • आई मंडल नामक व मुलींनी एका महिला पोलिस कर्मचाऱ्यास बेदम मारहान केल्याची घटणा मंगळवारी (दि. 23) घडली. 

अहेरी: नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीत मोदुमडगु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच्या जागेवरचे अतिक्रमण करण्यात आले होते. अतिक्रमन हटवण्यासाठी एपीआय संदिप हजारे यांच्या नेतृत्वात दोन महिला कर्मचारी व इतर पुरुष कर्मचारी उपस्थीत होते. आई मंडल नामक व मुलींनी एका महिला पोलिस कर्मचाऱ्यास बेदम मारहान केल्याची घटणा मंगळवारी (दि. 23) घडली. 

आई व मुलींच्या हातात कु-हाड व कोलते असल्याने सर्वच भयभयीत झाले होते. अशा परिस्थितीत एपीआय हजारे यांनी त्या महिलेकडून शस्त्र घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने धक्काबुक्की केली.

शेवटी अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाला यश आले. मात्र अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले कर्मचारी, अधिकारी, पोलिस यांचा हल्ल्याचा समाना करावा लागला हे विषेश.

तीन वर्षापासून मोदुमडगु येथे असलेल्या अहेरी वनविभाग जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. मात्र मोदुमडगु मध्ये असलेल्या एका सभाष मंडल या पोलिसकर्मचाऱ्याने त्या जागेवर अतिक्रमण केले होते. ही बाब कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायत, पोलिस स्टेशन, वनविभाग यांना अनेकदा त्यांना नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी अतिक्रमण काढले नव्हते, शेवटी पोलिस विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या चमूने अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न करत असताना अतिक्रमणधारक त्यांच्यावर हल्ला करण्याचे चित्र बघायला मिळाले.  या घटनेची नोंद पोलिस स्टेशन अहेरी येथे करण्यात आली व आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले

पोलिस कर्मचा-यावर योग्य कारवाई करावी
सरकारी जागेवर पोलिस कर्मचा-यानेच अतिक्रमण करणे व प्रशासनाकडून वांरवार नोटीस बजावुन देखील अतिक्रमण न काढणे. अतिक्रमण काढण्याकरीता तैनात पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कुटुंबातील पत्नी व मुलींकडून हल्ला चढविने हे अयोग्य आहे. पोलिस प्रशासनांनी या गंभीर घटनेची नोंद घेऊन प्रत्यक्ष आरोपी असलेल्या पोलिस कर्मचा-यावर योग्य कारवाई करावी. अशी मागणी आलापल्ली परिसरातील जणतेतून केल्या जात आहे. 

"अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही महिलांनी पोलिसांवर हल्ला केला. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या वर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहे. यात जो कोणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असेल त्यांच्यावर नियमा नूसार कारवाई केल्या जाईल."

- सतीश होडगर, पोलिस निरीक्षक, पो. स्टे. अहेरी.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News