पोलिस आयुक्तांनी घेतला मुख्याध्यापक, प्राचार्यांचा क्‍लास! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019

सोलापूर: पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मंगळवारी शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेताना काही सूचनाही केल्या. 

यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, मधुकर गायकवाड, बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त रुपाली दरेकर, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. 

पोलिस आयुक्त म्हणाले, "पोलिस हा सर्व गोष्टींचा उपाय नाही, आपण सगळ्यांनी मिळून विद्यार्थी सक्षम कसा होईल याचा विचार केला पाहिजे. महाविद्यालय आणि शाळांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. मोबाईलच्या व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर नेण्यासाठी प्रयत्न करावेत.'
 
शाळा आणि महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. दामिनी पथकाची संख्या वाढविण्यात येईल तसेच त्यांचा व्हाट्‌सअँप क्रमांक देण्यात येईल. शाळा कॉलेज परिसरात गुटखा व इतर अवैध विक्री होत असल्यास पोलिसांना कळवावे. आगाऊपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे द्यावीत, त्यांच्या पालकांना बोलावून समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येईल. 

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News