साहित्य मंचाचे स्वातंत्र्यदिनानिमित्त कवी संमेलन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 12 August 2019
  • यवतमाळ साहित्य मंचाने स्वातंत्र्यदिनानिमित्त कवी संमेलन आयोजित केले
  • कवी संमेलन गुरुवार (ता.15) दुपारी 3 वाजता येथील जेष्ठ नागरिक भवन बालाजी सोसायटी येथे होणार

यवतमाळ: शहरात नव्यानेच स्थापन झालेल्या यवतमाळ साहित्य मंचाने स्वातंत्र्यदिनानिमित्त कवी संमेलन आयोजित केले आहे. हे कवी संमेलन गुरुवार (ता.15) दुपारी 3 वाजता येथील जेष्ठ नागरिक भवन बालाजी सोसायटी येथे होणार आहे. स्वागताध्यक्ष जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंतराव चिंतावार राहतील तर कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांचे हस्ते होईल. 

कवी संमेलनाध्यक्ष म्हणून यवतमाळातील जेष्ठ कवी गुलाब सोनोने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यवतमाळातील जवळपास 35 दिग्गज कवी या संमेलनात विविध विषयावरील आपल्या कविता सादर करणार आहे. संमेलनाचे सुत्रसंचालन अर्चना वासेकर शेरजे आणि स्वप्नील कुलकर्णी करणार आहेत. संमेलनात भाग घेणाऱ्या कवींना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

यवतमाळ मधिल रसिक जनतेसाठी ही कवितेंची मेजवानी ठरणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मंचाचा उत्साह वाढवावा असे आवाहन यवतमाळ साहित्य मंचतर्फे करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News