पंतप्रधान मोदी नव्या भारतातील हिटलर; मनसेची संतप्त प्रतिक्रिया 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 19 August 2019
  • नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविली

मुंबई : कोहिनूर मिल प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीस विरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत." अशी प्रतिक्रिया मनसेकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविली असून येत्या 22 ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. 

याबाबत प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की,  'राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचे जराही आश्चर्य वाटत नाही. सरकार सूडाचे राजकारण करत असून हा दबाव तंत्राचा भाग आहे. आम्ही अशा दबावतंत्राला मुळीच भीक घालत नाही. राज ठाकरे यांच्यावर कारवाई झाल्यास आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू.'  

 

काय आहे प्रकरण?
राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी मिळून दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी २००८ साली या प्रकरणी आपले सर्व शेअर्स विकले होते. मात्र, त्यानंतरही राज ठाकरे या कंपनीत सक्रिय असल्याचे सांगत याप्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. त्यानुसार राज ठाकरे याना नोटीस बजावण्यात आली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News