प्रदुषण रोखण्यासाठी तरुणाने केले 'पीएम 2.5' उपकरण तयार

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019
  • तरुणाने त्या उपकरणास 'पीएम 2.5' असे नाव दिले असुन हे उपकरण वाहनांच्या सायलेंसरला लावल्यास वाहनांतुन निघणारा वायु नियंत्रीत करता येइल. सदर तरुण आयआयटी खडगपूरच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी शिकत असुन देवयान साहाने हे उपकरण तयार केले आहे. 

प्रदुषण रोखण्यासाठी तरुण वर्ग नेहनीच काहीतरी नवनवीन उपकरणे तयार करत असतात. अशाच बाबतीत वाहनांद्वारे निघणाऱ्या वायु प्रदुषाणावर आळा घालन्यासाठी एका तरुणाने उपकरण तयार केले आहे. तरुणाने त्या उपकरणास 'पीएम 2.5' असे नाव दिले असुन हे उपकरण वाहनांच्या सायलेंसरला लावल्यास वाहनांतुन निघणारा वायु नियंत्रीत करता येइल. सदर तरुण आयआयटी खडगपूरच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी शिकत असुन देवयान साहाने हे उपकरण तयार केले आहे. 

देवयान साहाने उपकरणाबाबत माहिती दिली असता त्याने सांगितले. या उपकरणाच्या सहाय्याने इलेक्ट्रिक उर्जा व तरंग उर्जाचा वापर केल्यास प्रदुषण रोखले जाउ शकते. त्यामुळे वाहनांनमधुन निघणाऱ्या वायुतील कणांना आकर्षित करते. हे उपकरण एखाद्या चुंबकाप्रमाणे काम करत असुन त्या कणांनचा आकार वाढल्यास हवेत प्रदुषण होण्याएवजी ते कण जमिनीवर पडतात. देवयानने सांगितले असता, वायु प्रदुषणातील समस्येचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की, प्रदुषणासाठी पीएम 2.5 वायु प्रदुषणातील घटक जबाबदार नसुन, त्या घटकाचा सुक्ष्म आकार आहे. जे आपल्या रक्तात सहजतेने शिरतात. त्यासाठी देवयानने वायु प्रदुषण रोखण्यासाठी हे उपकरण तयार केले आहे.     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News