दयानंद कला महाविद्यालयात “प्लास्टिक मुक्तीची शपथ" 

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 October 2019
  • दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये गांधीजी यांच्या जयंती निमित्ताने प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली. 

लातूर: दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्र. प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड यांनी प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली. 

याप्रसंगी उपप्राचार्य (क.म.) अनिल माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. सुनिल साळुंके, डॉ. सुभाष कदम, डॉ. प्रणिता फड व 73 विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री. परमेश्वर मुंढे, श्री. शंकर वाघमारे, श्री. परमेश्वर कापसे व श्री. विष्णु चांदुरे यांनी परिश्रण घेतले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News