मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी : प्रज्ञासिंहची दोषमुक्ततेसाठी याचिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • साध्वी प्रज्ञाला तपासयंत्रणेने क्‍लीन चिट दिली आहे, असे एनआयएच्या वतीने सांगण्यात आले.
  • प्रज्ञासिंह ठाकूरसह तिघांनी दोषमुक्ततेसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
  • या याचिकेवर २९ जुलैला सुनावणी होणार आहे.

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह तिघांनी दोषमुक्ततेसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २९ जुलैला सुनावणी होणार आहे.

राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) साध्वी प्रज्ञासिंह यांना या प्रकरणात क्‍लीन चिट दिली आहे; मात्र विशेष न्यायालयाने ती अमान्य करत त्यांना आरोपी म्हणून कायम ठेवले आहे. प्रज्ञासिंह यांच्यासोबत ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांनीही दोषमुक्ततेसाठी याचिका दाखल केली आहे.  या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. आपल्याविरोधात पुरावे नसल्याचा दावा याचिकदारांनी केला आहे. याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहेत. 

साध्वी प्रज्ञाला तपासयंत्रणेने क्‍लीन चिट दिली आहे, असे एनआयएच्या वतीने सांगण्यात आले. विशेष न्यायालयात सरकारी पक्षाने दाखल केलेल्या छायांकित प्रतीच्या पुराव्यांनाही आरोपींनी विरोध केला आहे. या प्रतीच्या कादगपत्रांचा पुरावा मान्य होऊ शकत नाही, असा त्यांचा दावा आहे. या मुद्द्यावरही न्यायालयात सुनावणी होणार आहे. मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा ठार, तर शंभरहून अधिक जखमी झाले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News