या खेळाडूने भरला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019
  • फलंदाज प्रशिक्षकासाठी प्रवीण अमरे यांचा अर्ज
  • मुंबईला रणजी विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा

मुंबई : माजी कसोटीपटू आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गुणवत्ता शोध मोहिमेतील प्रवीण अमरे यांनीही भारतीय संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या अमरे यांनीही अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी ११ कसोटीत ४२५ धावा केल्या आहेत. त्यांनी ३७ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अमरे यांनी आतापर्यंत मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले असून, त्यांनी मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा ऊचलला आहे. सध्या ते अमेरिका क्रिकेटमध्ये फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. 

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीची जेवढी चर्चा होत नाही, तेवढी फलंदाजी प्रशिक्षकाची सुरू आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांचे पारडे या शर्यतीत चांगलेच जड मानले जात असले तरी, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना हटवले जाणार यात शंका नाही. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News