प्लास्टिक मुक्तीसाठी शिरसाड येथे शालेय विद्यार्थ्यांनी केले प्लॅस्टीक कचरा संकलन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 4 October 2019

2 ऑक्‍टोबर 2019 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती वैविध्यपूर्ण प्रकारे साजरी करण्यात आली. यावेळी या थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. 

शिरसाड - 2 ऑक्‍टोबर 2019 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती वैविध्यपूर्ण प्रकारे साजरी करण्यात आली. यावेळी या थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. 

शाळेतील शिक्षक श्री. महेबुब शेख सर यांनी आपण सर्वांनी लाल बहादूर शास्त्री यांच्यासारखे 'साधी राहणी व उच्च विचारसरणी' या उक्तीप्रमाणे जीवन जगले पाहिजे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसा या शिकवणीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेतील शिक्षक श्री. दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना गांधीगिरी बद्दल सांगितले. 

विद्यार्थ्यांना गांधीगिरीबद्दल खरच खूप कुतूहल वाटले. यावेळी परिसर व गाव स्वच्छ करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही दादागिरी नव्हे तर गांधीगिरी करून आपले गाव स्वच्छ करण्याचे ठरवले.  त्यानंतर अध्यक्षिय भाषणात बोलताना  शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता धनंजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्याप्रमाणे आपणही स्वच्छतेचे उपासक होऊन आपला परिसर, आपली शाळा आणि आपले गाव स्वच्छ आणि सुंदर करूया असे आवाहन केले. 

उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्तीची व स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर गावांमध्ये प्रभातफेरी काढून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.  सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी श्रमदानातून शालेय परिसरातील व गावातील रस्त्यावरील प्लास्टिक कचरा संकलन केला व गावकऱ्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका असे आवाहन केले. 

लोकांनी रस्त्यावर फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या उचलून विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वच्छतेबरोबर प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत एक प्रकारे गांधीगिरी केली. त्याबद्दल गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News