प्लास्टिकचा मानवी शरीरात असा होतो प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • प्लास्टिकच्या बेसुमार वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. प्लास्टिक पोटात जात असल्याने जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना दिवसाआड वाचनात येतात.
  • आता मानवी शरीरही प्लास्टिकच्या आक्रमणाला बळी पडण्याची चिन्हे असून, आठवडाभरात ५ ग्रॅम तर वर्षाला २५० ग्रॅम प्लास्टिक पोटात जात असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. प्लास्टिकचे संकट आता आपल्या आसपासच नव्हे तर शरीरातही शड्डू ठोकून उभे आहे.

प्लास्टिकच्या बेसुमार वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. प्लास्टिक पोटात जात असल्याने जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना दिवसाआड वाचनात येतात. आता मानवी शरीरही प्लास्टिकच्या आक्रमणाला बळी पडण्याची चिन्हे असून, आठवडाभरात ५ ग्रॅम तर वर्षाला २५० ग्रॅम प्लास्टिक पोटात जात असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. प्लास्टिकचे संकट आता आपल्या आसपासच नव्हे तर शरीरातही शड्डू ठोकून उभे आहे. येत्या काळात ठोस उपाययोजनांसह नियोजन केले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होणार, याबाबत तीळमात्र शंका नाही.

वर्ल्ड वाइड फंड आणि ऑस्ट्रेलियातील न्यू कासल विद्यापीठाने याविषयी पुढाकार घेऊन जगभरात ५० ठिकाणी मायक्रो प्लास्टिकचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचे सर्वेक्षण केले. यातून पुढे आलेले निष्कर्ष मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. विविध माध्यमांद्वारे एका आठवड्यात सुमारे २ हजार प्लास्टिकचे कण शरीरात जातात. मानवाचे सरासरी वय ६० वर्षे गृहीत धरल्यास त्यावेळी त्याने अठरा किलो प्लास्टिक पोटात साठवलेलं असेल. पोटामधील इंद्रियांना बाहेरील अतिशय लहान घटकही चालत नाही. या कणांचा शरीर जोरदार विरोध करते. जर पोटात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जाणार असेल तर शरीर त्यास कसे प्रत्युत्तर देईल, याची कल्पनाच न केलेली बरी.

 कॅरीबॅगचा वापर वाढल्यापासून प्लास्टिकचा फास मानवाच्या गळ्याभोवती आवळला जात आहे. प्लास्टिक टिकाऊ असल्याने त्याचा वापर वाढला पण ते कुजत नाही आणि विघटितही होत नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर संपताच त्या जमेल तिथे फेकून दिल्या जातात आणि त्यांचे कधीही न संपणारे ढीग जमा होतात. गेल्या दहा वर्षांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि छोटी पाकिटे यांनी हा धोका अधिक गंभीर करून टाकला आहे. भारतात दररोज १ कोटी पाण्याच्या बाटल्या पाणी पिऊन फेकल्या जातात, तर १० कोटी छोटी पाकिटे जागा मिळेल तिथे फेकून दिली जातात. त्यांचे पुन्हा काहीच होत नाही. ही पाकिटे आणि बाटल्या कुजत नाहीत, नासत नाहीत. आहे त्या अवस्थेत पडेल तिथे पडून राहतात. गायी-म्हशींच्या खाण्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या येतात आणि त्यांच्या पोटात जातात. त्यांचे परिणाम गायी-म्हशींच्या शरीरावर तर होतातच; परंतु त्यांच्या दुधांमधून तसेच दुधाच्या पिशव्यांमधूनही मानवी शरीरात प्लास्टिक पोचत आहे.

कोणत्याही शहरातून फेरफटका मारला तर जागोजागी कॅरीबॅग, निरनिराळ्या पॅकिंगसाठी वापरलेले विविध प्रकारचे प्लास्टिक, वापरून टाकलेले पेन, संगणक, टेप, सिडीज, गुटख्याची पाकिटे यांचे ढीग दिसायला लागतात. रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांत, गटारीत, कचऱ्याच्या कुंड्यांच्या आसपास, अनेक हॉटेलांच्या तसेच हॉस्टेल्सच्या पिछाडीला या प्लास्टिकच्या ढिगांचे दृश्‍य पाहायला मिळते. रेल्वेस्थानक, बसस्टॅन्ड, पर्यटनाची ठिकाणे अशा ठिकाणीही हेच दृश्‍य दिसते. घरातले शिळे, खरकटे प्लास्टिकच्या पिशव्यात घालून त्या पिशव्या आपल्या घरासमोर रस्त्याच्या कडेला टाकून दिल्या जातात. म्हणजे न कुजणाऱ्या पिशव्याच केवळ पडलेल्या आहेत असे नाही तर त्यांच्यासोबत हे अन्नही आहे.

त्यातून काय होत असेल याची कल्पनाही येणार नाही.प्लास्टिकच्या बेसुमार वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. प्लास्टिक पोटात जात असल्याने जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना दिवसाआड वाचनात येतात. आता मानवी शरीरही प्लास्टिकच्या आक्रमणाला बळी पडण्याची चिन्हे असून, आठवडाभरात ५ ग्रॅम तर वर्षाला २५० ग्रॅम प्लास्टिक पोटात जात असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. प्लास्टिकचे संकट आता आपल्या आसपासच नव्हे तर शरीरातही शड्डू ठोकून उभे आहे. येत्या काळात ठोस उपाययोजनांसह नियोजन केले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होणार, याबाबत तीळमात्र शंका नाही.

वर्ल्ड वाइड फंड आणि ऑस्ट्रेलियातील न्यू कासल विद्यापीठाने याविषयी पुढाकार घेऊन जगभरात ५० ठिकाणी मायक्रो प्लास्टिकचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचे सर्वेक्षण केले. यातून पुढे आलेले निष्कर्ष मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. विविध माध्यमांद्वारे एका आठवड्यात सुमारे २ हजार प्लास्टिकचे कण शरीरात जातात. मानवाचे सरासरी वय ६० वर्षे गृहीत धरल्यास त्यावेळी त्याने अठरा किलो प्लास्टिक पोटात साठवलेलं असेल. पोटामधील इंद्रियांना बाहेरील अतिशय लहान घटकही चालत नाही. या कणांचा शरीर जोरदार विरोध करते. जर पोटात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जाणार असेल तर शरीर त्यास कसे प्रत्युत्तर देईल, याची कल्पनाच न केलेली बरी.  

कॅरीबॅगचा वापर वाढल्यापासून प्लास्टिकचा फास मानवाच्या गळ्याभोवती आवळला जात आहे. प्लास्टिक टिकाऊ असल्याने त्याचा वापर वाढला पण ते कुजत नाही आणि विघटितही होत नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर संपताच त्या जमेल तिथे फेकून दिल्या जातात आणि त्यांचे कधीही न संपणारे ढीग जमा होतात. गेल्या दहा वर्षांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि छोटी पाकिटे यांनी हा धोका अधिक गंभीर करून टाकला आहे. भारतात दररोज १ कोटी पाण्याच्या बाटल्या पाणी पिऊन फेकल्या जातात, तर १० कोटी छोटी पाकिटे जागा मिळेल तिथे फेकून दिली जातात. त्यांचे पुन्हा काहीच होत नाही. ही पाकिटे आणि बाटल्या कुजत नाहीत, नासत नाहीत. आहे त्या अवस्थेत पडेल तिथे पडून राहतात. गायी-म्हशींच्या खाण्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या येतात आणि त्यांच्या पोटात जातात. त्यांचे परिणाम गायी-म्हशींच्या शरीरावर तर होतातच; परंतु त्यांच्या दुधांमधून तसेच दुधाच्या पिशव्यांमधूनही मानवी शरीरात प्लास्टिक पोचत आहे.

कोणत्याही शहरातून फेरफटका मारला तर जागोजागी कॅरीबॅग, निरनिराळ्या पॅकिंगसाठी वापरलेले विविध प्रकारचे प्लास्टिक, वापरून टाकलेले पेन, संगणक, टेप, सिडीज, गुटख्याची पाकिटे यांचे ढीग दिसायला लागतात. रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांत, गटारीत, कचऱ्याच्या कुंड्यांच्या आसपास, अनेक हॉटेलांच्या तसेच हॉस्टेल्सच्या पिछाडीला या प्लास्टिकच्या ढिगांचे दृश्‍य पाहायला मिळते. रेल्वेस्थानक, बसस्टॅन्ड, पर्यटनाची ठिकाणे अशा ठिकाणीही हेच दृश्‍य दिसते. घरातले शिळे, खरकटे प्लास्टिकच्या पिशव्यात घालून त्या पिशव्या आपल्या घरासमोर रस्त्याच्या कडेला टाकून दिल्या जातात. म्हणजे न कुजणाऱ्या पिशव्याच केवळ पडलेल्या आहेत असे नाही तर त्यांच्यासोबत हे अन्नही आहे. त्यातून काय होत असेल याची कल्पनाही येणार नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News