खर्डी महाविद्यालयात प्लास्टिक मुक्त अभियान संपन्न

दिव्येश जाधव (खर्डी)
Tuesday, 24 September 2019
  • महाविद्यालयाच्या प्राचार्य के. आर. कळकटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला.

खर्डी: जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आले. प्लास्टिक मुक्त अभियान सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पूर परिस्थिती निमार्ण होण्याचे कारण म्हणजे प्लास्टिक, कारण त्याचे लवकर विघटन होत नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. म्हणून पूर परिस्थिती निर्माण होते. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले.

यावेळी संपूर्ण कॉलेज परिसरातील व विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक जमा करण्यात आले व महाविद्यालयाच्या प्राचार्य के. आर. कळकटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला व त्यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापरू नये, याचे आवाहन केले व प्लास्टिक जमा करून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकची विल्हेवाट लावली.

यावेळी प्लास्टिक व कचर्‍याची योग्य विल्हेवाट व व्यवस्थापन यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. अपर्णा जाधव(रा.से.यो.) व प्रा. प्रियंका पवार (रा.से.यो.) यांनी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली व कॉलेजचा परिसर स्वच्छ केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News