फार्मसी कॉलेज रासेयो द्वारा प्लास्टिक मुक्ती जनजागृती  कार्यक्रम 

रुपेश बाजड, रिसोड
Thursday, 17 October 2019
  • अभियानाद्वारे कॉलेज ऑफ फार्मसी रासेयोचे विद्यार्थी स्वयंसेवक महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या 'स्वच्छ भारत प्लास्टिक मुक्त भारत' या योजनेचे महत्त्व स्थानिक जनता, दुकानदार, भाजीमंडी व्यापारी, यांना पटवून देण्यात आले. 

रिसोड - महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या मा. साधनाताई गवळी, जितेंद्र पटोले आणि डॉ. विजयकुमार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ फार्मसी पुंडलिक नगर देगांव येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारा प्लास्टिक मुक्त पर्यावरण जनजागृती अभियान आयोजण करण्यात आले. या अभियानाद्वारे कॉलेज ऑफ फार्मसी रासेयोचे विद्यार्थी स्वयंसेवक महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या 'स्वच्छ भारत प्लास्टिक मुक्त भारत' या योजनेचे महत्त्व स्थानिक जनता, दुकानदार, भाजीमंडी व्यापारी, यांना पटवून देण्यात आले. 

या अभियानातून कॉलेज विद्यार्थ्यांनी स्थानिकासी संवाद साधला तसेच मित्रहो, ‘स्वच्छ व प्लास्टिकमुक्त भारत’ हे आपले व्हिजन आहे, प्लास्टिकच्या वाढत्या वापराने जल, वायू व भूमी सातत्याने प्रदुषित होत चालली आहे, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित केलेल्या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत येत्या सहा महिन्यात प्लास्टिकवर पूर्णत: बंदी आणून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. 

प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आव्हान स्थानिक लोकांशी करण्यात आले, तसेच प्लास्टिक पिशव्यांच्या वापराने होणार्‍या दुष्परिणामांची कल्पनाही जनतेला करून दिली. शेवटी विद्यार्थ्यांनी सांगितले की आपण सर्व मिळून महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त करू, याची खात्री आहे. चला तर, राज्यात लोकसहभागातून ‘प्लास्टिक बंदी’ करण्यास हातभार लावूया.

या कार्यक्रमाला प्रा. युवराज पांढरे, प्रा. पंकज फितवे, प्रा. आशिष ताले, प्रा. रामेश्वर राजगुरू, प्रा. महेश केकन, तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रा. राजनंदिनी सुरोशे, प्रा. चेतन कदम तसेच रासेयोचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. विजयकुमार हुक्केरी तसेच डॉ. सुनील क्षिरसागर यांचे मोलाचे योगदान लाभले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News