गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यास एक-एक झाड जोपासण्यासाठी दत्तक देण्यात आले.

गडचिरोली : येथील कृषी महाविद्यालयात ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार होते. 

प्रमुख पाहुणे म्हणून सहयोगी प्रा. डॉ. व्ही. जे. जांबे, डॉ. आर. एस. वाघमारे, डॉ. नेहा चोपडे, डॉ. पी. व्ही. महातळे, एस. एस. कऱ्हाळे, डॉ. व्ही. पी. बाभूळकर, डॉ. मंजूषा गायकवाड, डॉ. एम. एम. वाकोडे, डॉ. हर्षा मेंढे, डॉ. शुभांगी अलेक्‍झांडर, डी. टी. उंद्रटवाड, एच. एम. खोब्रागडे, आर. आय. खोब्रागडे, डॉ. वी. जी. काळपांडे, योगेश चौके, सारिका पोंगडे, आदित्य घोगरे, संदिप नाकाडे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यास एक-एक झाड जोपासण्यासाठी दत्तक देण्यात आले. कार्यक्रमासाठी विवेक सातार, अरविंद सातपुडके व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News