कडधान्याचा पिझ्झा  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 July 2019

साहित्य : पाव किलो आख्खे मूग, पाव किलो मटकी, पाव किलो नागली, पाव किलो आख्खे मसूर, एक किलो उकडा तांदूळ. 

कृती : सर्व धान्ये वेगवेगळी मुठशेकी भाजून घ्यावीत. कडधान्ये एकत्र करून दळून आणावीत आणि तांदूळ वेगळा दळून आणावा. हे पीठ वेगवेगळ्या रेसिपीसाठी वापरू शकता; पण आज आपण पिझ्झा बघूया. तीन भाग तांदळाची पिठी आणि एक भाग कडधान्याचे पीठ एकत्र करावे. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून डोसा पिठाप्रमाणे भिजवावे. 

पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. नेहमीप्रमाणे डोसा करावा. त्यावर मेयोनिझ आणि टोमेटो सॉस पसरावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि बारीक शेव पसरावा. झाकण ठेवून एक वाफ काढावी. पिझ्झा कटरने तुकडे करून घ्यावेत. हा मुलांच्या डब्यासाठी आवडता खाऊ होतो. मिश्र कडधान्यांमुळे रंग थोडा तांबूस येतो; पण पिझ्झासारखे बनवल्याने मुलं आवडीने खातात. त्याचबरोबर कडधान्यातून मिळणारी सारी पोषकतत्वे मिळतात. आवडत असल्यास नुसत्या कडधान्याच्या पिठाचा पिझ्झा बनवू शकता. तांदूळ पिठी टाकायची गरज नाही, तसेच या कडधान्याच्या पिठाचा ताकात भिजवून तूप-जिरे-दालचिनी-काळी मिरी घालून सुपही करू शकता. मधल्या वेळेला मुलांना खायला इन्स्टंट सूप मस्त होते. वरील प्रमाणात केलेले पीठ सहा महिने पुरते. नको असल्यास कमी प्रमाणही घेऊ शकता, तसेच आवडत असल्यास इतरही काही (अख्खे उडीद, मेथी दाणे वगैरे) घालू शकता.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News