मुलींनो सावधान! शरीरसुख म्हणजे प्रेम नव्हेच...

दिगंबर कुंडलिकजी वंजारी
Tuesday, 30 July 2019

केवळ मुलचं दोषी असतात असे नाही तर सर्व प्रकाराला मुलीही तेवढ्याचं जबाबदार.
 

प्रेम म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन, एकमेकांवरील अतूट विश्वास म्हणजेच प्रेम असते. प्रेम हे मन मोहून टाकनाऱ्या बाळाच्या हास्यासारखं असतं, प्रेम ही एकमेकांच्या सहवासात आपल्या साथीदाराला जपन्यासाठी केलेली धडपड असते, प्रेम म्हणजे मनाने मनासाठी केलेली साठवण असते, प्रेम करण्यासाठी शरिराने एकत्र आलेचं पाहीजे असे काहीचं नसते. 

शरिरापेक्षा दोन आत्मांचे सुंदर मिलन असते. दोन हृदय तुटूनही आजन्म सलनारी सुंदर जखम असते आणि ती जखम खोलवर रूजत असते. प्रेम हे दोघांमधील होणाऱ्या दुराव्याचा भास घडवत असते, एकंदरीत प्रेम म्हणजे प्रेमचं असते.

सध्या प्रेमाच्या नावाखाली युवतींची फसवणूक करन्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. काही युवक तर विविध आकर्षनांनी मुलींना जाळ्यात फसवण्याचे काम षडयंत्र रचून करत असतात. मुलींना प्रेमाचे चॉकलेट द्यायचे आणि शोषण करून सोडून द्यायचे असे प्रकार सर्रास घडत असून यामुळे अल्पवयीन मुलींचे आयुष्य उध्वस्त होत आहे. प्रेमाच्या नावाखाली युवक युवतींसह विविध स्वप्ने रंगवीतात, त्यांचे शारिरीक शोषण केले जाते व त्यानंतर त्यांना सोडून दिले जाते किंवा त्यांचा देहव्यापारही होतो बहुदा.

प्रेमाची विविध स्वप्ने रंगवलेल्या मुलीची सर्व स्वप्ने एका क्षणात चकनाचूर होतात, तिची फसवनुक झाली कळते. ती कुनाला तोंड दाखवु शकत नाही, समाजात तिला आधार देण्याऐवजी तिची छेड काढली जाते व घडलेल्या प्रकाराने मानसिक संतुलन बिघडलेली मुलगी समाजभिती पोटी आत्महत्येसारखा अगदी टोकाचा पर्याय निवडते व सुंदर जिवण संपवून घेते. अशा प्रकाराला जास्तीत जास्त अल्पवयीन मुलीचं बळी पडतात. काय चुक असते त्या नाजूक सुकूमार कळ्यांची? फक्त एवढीचं की ते मुलांवर विश्वास टाकुन आपले सर्वस्व त्यांना अर्पन करतात.

त्या चुकीची भरपाई त्यांना आपला जिव गमावुन करावी लागते. प्रेमाच्या नावाखाली हे असले प्रकार आनखी किती दिवस चालनार? या समस्येला गंभिरतेने घेवुन याला कुठेतरी आळा बसला पाहीजे. त्यासाठी आई-वडील, शाळा व्यवस्थापन समिती, शिकवणी वर्गाचे संचालक तसेचं पोलिसांनी वेळीचं सावध होऊन या लफडेबाज ठगांपासुन मुलींचे संरक्षण करायला पाहीजे. परंतु या प्रकाराची माहिती असुनही या लोकांनी माहिती नसल्यासारखं वागणं भविष्यात मुलींचे आयुष्य धोक्यात घालू शकते, संपवु शकते.

मुलींना मुलांच्या प्रेमाचा काही अशाप्रकारे मोह पडलेला असतो की, त्या काय करीत आहेत, कशा वागत आहेत याची जाणीवचं त्यांना नसते. ट्युशन, कॉलेज, मैत्रीनींकडे जाते असे सांगुन मुलगी बाहेर पडते ती थेट मुलांसोबत बगीचे, हॉटेल किंवा सिनेमागृहात आणि आता त्यांची हिम्मत एवढी वाढली की चक्क रस्त्यावर उभे राहुन अश्लिल चाळे करायलापण घाबरत नाहीत. त्यांना संपुर्ण जगाचा विसर पडलेला असतो व दिवसेंदिवस त्यांचे मनमानी वागणे वाढत जाते. प्रेमाचा अर्थही माहिती नसलेली ही कारटी शरीर संबधांपर्यंत जावून पोहोचतात.

अशा प्रेमीयुगलांना पोलिसांनी किंवा स्थानिक नागरीकांनी वेळीचं हटकले तर कित्येक मुला-मुलींचे आयुष्य बरबाद होण्यापासुन वाचु शकतील. आजच्या शिक्षित तरूणींनी स्वतः जागरूत होत तरूणांच्या प्रेमजाळात न फसता आपले शिक्षण, करिअर, परीवार याकडे लक्ष द्यायला पाहिजे.

जपुन वावर पोरी, सार्यांचा तुझवर डोळा आहे
हवसेने भुकेला नराधम, तु समजू नको भोळा आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News