अंत्यसंस्कारालाही वेदनेची किनार

समीर मगरे
Tuesday, 16 July 2019
 • जिल्ह्यातील 797 गावांत स्मशानभूमी शेडच नाही, तर काही ठिकाणी स्मशनाभूमी शेड असूनही त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नाही
 • अंत्यसंस्कार करण्यासाठी ही वेदना सहन कराव्या लागतात असल्याने अंत्यसंस्कारालाही वेदनेची किनार लागली

यवतमाळ :  माणूस जन्माला आला की, त्या पाठोपाठ मरण हे त्याच्या मागेच येते. त्यापासून कोणाचीच सुटका नाही. जिल्ह्यातील 797 गावांत स्मशानभूमी शेडच नाही, तर काही ठिकाणी स्मशनाभूमी शेड असूनही त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी ही वेदना सहन कराव्या लागतात असल्याने अंत्यसंस्कारालाही वेदनेची किनार लागली असल्याची परिस्थिती आहे. 
 
ग्रामीण भागाचा विकासाचा कणा म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीमार्फत लाखो रुपयांच्या योजना राबविण्यात येतात. याबरोबर जनसुविधा व जिल्हा नियोजन समितीतून स्मशानभूमी शेडच्या बांधकामासाठी कोटीने निधी उपलब्ध करून दिला जातो. तरीदेखील आज जिल्ह्यातील 797 गावांत स्मशानभूमी शेड नसल्याची माहिती समोर आली आहे. याबरोबरच जिल्ह्यातील काही गावांत स्मशानशेड आहेत, तर त्या ठिकाणी रस्ताच नाही. सध्या पावसाचे दिवस आहेत.

त्यामुळे एखाद्याच्या घरी दुखत घटना घडली, तर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. राळेगाव तालुक्यातील चिखली या गावात स्मशानशेड आहे. मात्र, योग्य रस्ता नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर या गावकर्‍यांना रस्त्याच्या कडेलाच अंत्यसंस्कार करावा लागतो. तरीदेखील प्रशासन व स्थानिक पदाधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र सध्यातरी जिल्ह्यात दिसून येत आहे. राळेगाव तालुक्यातील चिखली या गावात मागील पाच वर्षांपूर्वीच स्मशानभूमी शेडचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु, स्मशनभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही.

रस्त्याअभावी गावाच्या भोवतालचा मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागते. जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून जिल्ह्यातील कोणत्या-कोणत्या गावांत स्मशनशेड नाही. याची माहिती मागविण्यात आली असून, त्याचा प्रस्तावदेखील नियोजन समितीत मांडण्यात येणार आहे. शासनामार्फत स्मशनभूमीशेड बांधकामकरिता जवळपास नऊ कोटी रुपये आले आहेत. नियोजन समितीत जिल्ह्यातील स्मशानभूमीशेड बांधकामाला हिरवी झेंडी मिळणार आहे. या सभेत किती स्मशानभूमीशेड बांधकाम करण्याकरिता परवानगी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

797 गावांत स्मशानभूमी शेडच नाही; अनेक ठिकाणी सुविधांचा अभाव
पंचायत समिती   शेड नसलेल्या गावांची संख्या

 • यवतमाळ          61
 • बाभूळगाव         22
 • कळंब               66
 • राळेगाव            46
 • घाटंजी              62
 • पांढरकवडा        80
 • मारेगाव           48
 • झरी जामणी      52
 • वणी                73
 • नेर                  41
 • दारव्हा             43
 • आर्णी              26
 • दिग्रस              26 
 • पुसद                70
 • महागाव            38
 • उमरखेड            43

               एकूण  -     797

 

जिल्ह्यातील ज्या गावात स्मशानभूमीशेड नाहीत त्या ठिकाणी बांधकाम करण्याकरिता शासनाकडून निधी आला आहे. याचा प्रस्तावसुद्धा नियोजन समितीत सादर करण्यात येणार आहे. या बांधकामाला मान्यता मिळताच लवकरच  बांधकामाला सुरुवात होणार आहे.

- श्याम जयस्वाल, उपाध्यक्ष जिल्हा परिषद, यवतमाळ.

 

जिल्ह्यातील स्मशनभूमीशेडचे बांधकाम रखडले आहे. मात्र, याकरिता निधी आला आहे. त्यामुळे नियोजन समितीकडे प्रस्तावसुद्धा सादर करणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच कामाला सुरवात होणार आहे. 

- अरविंद गुडधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग जिल्हा परिषद, यवतमाळ.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News