नागपूरच्या व्हीएनआयटीतल्या ‘प्लेसमेंट’चा टक्का यंदाही घसरला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

अभ्यासक्रमात तीन वर्षांत सातत्याने ‘प्लेसमेंट’चा टक्का घसरल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.

नागपूर  -  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॅंकिंग फ्रेमवर्कद्वारे (एनआयआरएफ) देशातील एनआयटीमधून सहाव्या क्रमांकावर असलेल्या विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या बी. टेक. अभ्यासक्रमात तीन वर्षांत सातत्याने ‘प्लेसमेंट’चा टक्का घसरल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.

देशभरातील नामवंत एनआयटीमध्ये व्हीएनआयटीचा समावेश होतो. महाविद्यालयात मागील वर्षी पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमात एक हजार ४२२ जागांपैकी एक हजार ३२८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावर्षी अद्याप प्रवेशप्रक्रियेस सुरुवात व्हायची आहे. दरवर्षी पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन केले जाते.

यावर्षी ३९३ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्तम २२ लाख (पर इयर) तर ॲव्हरेज साडेसात लाखांचे पॅकेज देण्यात आले. तीन वर्षांची तुलना केल्यास यावर्षी सर्वांत कमी विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाल्याचे दिसून येते. २०१६ मध्ये जवळपास ४९० तर २०१७ मध्ये ४०१ विद्यार्थ्यांची निवड केली होती. यावर्षी कंपन्यांचा विचार केल्यास केवळ दहा कंपन्यांनी प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभाग नोंदविला होता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News