लोटला जनांचा पुर, शेगाव झाले पंढरपुर 

श्रीधर डांगे
Friday, 12 July 2019

शेगाव -  विदर्भाची  पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. आज (ता.१२) जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत असून  भाविकांच्या मांदियाळीने शेगाव शहर  भाविकांनी गजबजून गेले आहे. श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जिल्ह्यातुनच नव्हे तर विदर्भातुन भाविकभक्त शेगावात दाखल झाले आहेत.

आषाढी एकादशी निमित्त आज दुपारी २ वाजता श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात नगरपरिक्रमेला निघेल. श्रींची पालखी श्री दत्त मंदिर, श्री हरहर मंदिर, श्री शितलनाथ महाराज संस्थान, सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेसमोरुन श्रींचे प्रगटस्थळ, श्री मारोती मंदिर, श्री गोरोबा काका मंदिर, लायब्ररी, प्राचीन शिवमंदिर, मातीची गढी, आठवडी बाजार चौक, बसस्थानक, व्यापारपेठ, गांधी चौक, लहुजी वस्ताद चौक या मार्गाने फिरून मंदिरात परत येईल. येथे पूजाअर्चा, आरती होवून आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. पंढरपूर येथे शेगाव संस्थानच्या शाखांमध्ये सुध्दा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे. संतनगरीत श्रींचे भक्त, वारकºयांसाठी फराळाची व्यवस्था करतात. श्री लहुजी उस्ताद चौकात भक्तांना, वारकऱ्यांना फराळी खिचडी, उसळचे वाटप करण्यात येत आहे. दरम्यान आषाढी एकादशीचा उत्सव जरी आज पार पडत असला तरी काल पासून शेगाव शहर वारकऱ्यांनी व भक्तांनी गजबजुन गेले होते. 

 पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त
वारकरी  व भक्तांच्या सेवेसाठी व सुविधेसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने देखील चोख बंदोबस्त लावण्यात आला असून पर्यायी वाहनतळाची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. व आवश्यकतेनुसार वाहतुक मार्गात बदल देखील करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News