डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपींना जामीन देण्यात आला आहे. तसंच आरोपींना एक दिवसाआड गुन्हे शाखेमध्ये हजेरी लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. आज या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील हेमा आहुजा, भक्ती मेहेर आणि अंकिता खंडेलवाल या तीन्ही आरोपींना आरोपी डॉ. पायल तडवीचा छळ करायच्या, जातीवाचक टीपण्णी करायच्या. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात तिन्ही आरोपींना 29 मे रोजी पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर आरोपींनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. 

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी १२०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. मुंबई उच्च न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. दरम्यान, जामीन देताना आरोपींना न्यायालयाने मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. तसेच त्यांना गुन्हे शाखेत हजेरी लावण्याची सक्ती न्यायालयाने केली आहे. नायर रुग्णालय आणि आग्रीपाडा परिसरामध्ये जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News