पवारसाहेब; तुमच्या हातून सातारा जातोय की काय?

ऋषिकेश पवार, सातारा
Friday, 6 September 2019

सातारा जिल्ह्यानं पवार साहेबांवर भरभरून प्रेम केलं. काँग्रेस सोडल्यानंतर साताऱ्यातून साहेबांनी जोडलेले एक एक शिलेदार पुढे आले...

१९९८ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेस सारख्या मोठ्या राजकीय पक्षातून बाहेर पडून स्वतःचा पक्ष उभं करणं तितकंसं सोपं न्हवत; पण सातारा जिल्ह्यातून साहेबांना पहिल्यापासून विशेष प्रेम मिळालं. स्व.यशवंतराव चव्हाण साहेब स्व.किसन वीर आबांचा हा आवडता युवा नेता. त्यामुळं सातारा जिल्ह्यानं पवार साहेबांवर भरभरून प्रेम केलं. काँग्रेस सोडल्यानंतर साताऱ्यातून साहेबांनी जोडलेले एक एक शिलेदार पुढे आले अन् राष्ट्रवादी उभी राहिली.

सातारा जिल्हा साहेबांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. या सातारा जिल्ह्यानं साहेबांची साथ कधी सोडली नाही. अमाप प्रेम इथल्या जनतेनं दिल. तितकंच साहेबांनी ही जनतेला दिलं. स्व.लक्ष्मणतात्या पाटील, स्व. अभयसिंहराजे भोसले हे साहेबांचे निष्ठावान सहकारी. तात्यांनी राष्ट्रवादी एकसंघ बांधून ठेवली होती. जिल्हा बँकेच्या भरती वेळी आ. जयकुमार गोरेंनी केलेलं उपोषण तात्यांच्या शब्दखातर जयकुमार गोरेंनी सोडलं हे साऱ्या जिल्ह्यान पाहिलं. म्हणजे तात्यांचा शब्दाला फक्त राष्ट्रवादीतच नाही तर इतर पक्षात ही मान होता.

मान का होता? तर तात्या निष्ठावान होते. जनसामान्यांच्या वेदना जाणणारे होते. मा. मकरंद आबा पाटील तो वारसा जपत आहेत. एक काळ असा होता की जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत होती. माण-खटाव मध्ये आ. जयकुमार गोरेंनी किंगमेकर स्व.माजी आमदार सदाशिव पोळ्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. तिथं काँग्रेस चा झेंडा फडकला. पाटण च राजकारण नेहमीच वर खाली पण तिथं आ. शंभुराज देसाईंनी भरपूर फरकानं माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकारांचे सुपुत्र मा. सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. 

दक्षिणेत विलासकाका बरेच वर्ष होते तो गड पृथ्वीराजांनी घेतला पण तिथं काँग्रेस च राहिली. साताऱ्यात मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी सांभाळत होते. कोरेगाव मधून आ.शशिकांत शिंदे, उत्तरेत आ.बाळासाहेब पाटील, वाईत आ.मकरंद आबा पाटील तर फलटण आ. दीपक चव्हाण म्हणजेच रामराजेंकड .. एकंदरीत राष्ट्रवादी मजबूत होती. पण शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता पक्षाला घरघर लागली आहे. 

सध्यपरिस्थिती बघता सताऱ्यातून जर राष्ट्रवादीने तगडा उमेदवार दिला नाही तर शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रवास सोपा आहे. त्यांना एखाद  मंत्रिपद अथवा राज्यमंत्री पद देऊन जिल्हाभर कमळ फुलवण्यासाठी प्रोत्साहित केल जाऊ शकत. कोरेगाव मधून मा. महेश शिंदे नी ताकद लावली आहे तिथं काटे की टक्कर होणार हे दिसत आहे .आ. शशिकांत शिंदे साठी महेश शिंदेंची उमेदवारी डोकेदुखी ठरणार आहे. कोरेगाव मधून नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही. 

दक्षिणेत त्रिशंकू अवस्था आहे पण अतुल भोसलेंनी जोर लावला आहे तिथंही कदाचित भाजप कमळ फुलवू शकेल. वाई मतदार संघातून आ. मकरंद पाटील निष्ठा जपत राष्ट्रवादी सोबत आहेत त्यांना कोणताही धोका आहे असं जाणवत नाही. पाटण ची लढाई पुन्हा एकदा देसाई व पाटणकर यांच्यातच असेल तिथला निकाल नेहमीप्रमाणे  रंजकच असेल. उत्तरेत सद्यस्थितीत आ. बाळासाहेब पाटील तगडे आहेत .भाजपचे मनोज घोरपडे व काँग्रेस चे धैर्यशील कदम हे वेगळे लढले तर आ. पाटील यांच काम सोपं आहे. 

पण चंद्रकांत दादांनी जर धैर्यशील कदम व मनोज घोरपडे या दोघांना एकत्र आणलं तर उत्तरेत आ. पाटील यांना खुप प्रयत्न करावे लागतील . माण चे आमदार जयाभाऊ गोरे भाजपवासी होण्याच्या तयारीत असले तरी मध्यंतरी त्यांनी काँग्रेस च्या बैठकीला हजेरी लावली होती. परंतु ते भाजप मधून लढतील असा अंदाज आहे. नुकतेच सेनेत गेलेले शेखर गोरे त्यांच्या विरोधात लढतील. शेखर गोरे यांनीही जोरदार तयारी केली आहे. 

रामराजे आपली भूमिका केंव्हा स्पष्ट करतात ते पाहावं लागेल परंतु कट्टर विरोधक खा. रणजितसिंह निंबाळकर व जयकुमार गोरे यांच्यासोबत ते भाजप मध्ये कसे राहणार हा प्रश्न आहे. माढा मतदारसंघात त्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. सताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे आताभाजप वासी झाले आहेत. भाजप ने दिपकबापू पवारांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊन शिवेंद्रसिंहराजे यांना आमदार होण्यासाठी बढती दीली आहे. जयभाऊ ही भाजप मधून लढले अन युती असेल तर शेखर गोरेंना अपक्ष लढावं लागेल किंवा माण -खटाव जर सेनेला मिळाला तर जयभाऊ अपक्ष लढू शकतात.

सारी परिस्थिती बघता सातारा राष्ट्रवादी कडून जातोय की काय असं वाटू लागलं आहे. ज्यांना शरद पवारांनी मोठं केलं असे राज्यातले अनेक मोठे नेते भाजप मध्ये पोहचून सेट झाले. कुणी कारवाया टाळण्यासाठी तर कुणी भविष्याच्या चिंतेने तिकडे उडी घेतली. पण सत्तेत राहूनच काम करता येतात हा गैरसमज आ.बच्चू कडू यांच्याकडे पाहून दूर होतो. रोहित पवार यांच्या रूपाने नवा नेता राष्ट्रवादीला मिळतो आहे. त्यांना उज्जवल भविष्य आहे हे दिसतंय. 

त्यांना घेऊन साहेबांनी साताऱ्यात ही राष्ट्रवादीचा तरुण वर्ग बळकट करायला हवा. जाणाऱ्यांना जाऊ देऊन सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी. साहेब चाणक्य आहेत हे सारा देश  जाणतो पण आता चाणक्य च संकटात आहे असं दिसतंय. खासदार उदयनराजे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. डॉ. अमोल कोल्हे व उदयनराजे हे स्टार प्रचारक जर चालले तर राष्ट्रवादीला फायदा होईल. साताऱ्यात सध्या आउटगोइंग च वार आहे . यावर साहेब आता काय तोडगा काढतात हे आता येणारा काळच सांगेल...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News