पवार-गांधींची पुन्हा भेट, तर शिवसेनेचे घोंगडे अजूनही भिजत

यिनबझ टीम
Saturday, 16 November 2019

मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरीही सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना प्रयत्न करत आहे. पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी तसेच पक्षश्रेष्टींच्या भेटीगांठींनाही वेग आला होता. 

शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्या बाळासाहेबांच्या पुण्यतिथी दिवशी शपथ घेणार असल्याची गोष्ट व्हायरल होत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोनिया गांधींची भेट घेण्याचं ठरवलं आहे. उद्या दिनांक 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता ही भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कोट्यातून येत आहे.

या भेटीचे कारण अस्पष्ट असलं तरी राज्यातल्या सर्व राजकीय परिस्थितीला घेऊन ही भेट असणार आहे, त्यातच महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेवर याबद्दल बैठक असल्याचेही समजते.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या तिन्ही पक्षांतल्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठकी झाल्या, त्यावर नेमका काय तोडगा काढला गेला हे जरी अजून स्पष्ट झालं नसलं, तरी उद्या होणाऱ्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमध्ये महाआघाडीला घेऊन सगळ्या गोष्टी दूर होतील, असेही म्हटले जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News