निवडणुकांपूर्वी युद्ध होईल असं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं - पवन कल्याण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 1 March 2019

अमरावती (आंध्रप्रदेश) :  लोकसभा निवडणुकांआधी युद्ध होईल, असं भाजपच्या नेत्यांनी मला दोन वर्षांपूर्वीच सांगितलं होते, असं खळबळजनक वक्तव्य दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी केले आहे.

अमरावती (आंध्रप्रदेश) :  लोकसभा निवडणुकांआधी युद्ध होईल, असं भाजपच्या नेत्यांनी मला दोन वर्षांपूर्वीच सांगितलं होते, असं खळबळजनक वक्तव्य दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी केले आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून केलेल्या कारवाईमुळे भारत-पाकिस्तानमध्ये युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. यात आंध्र प्रदेशातील अभिनेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

पवन कल्याण यांनी सध्याच्या परिस्थतीबद्दल बोलताना म्हणाले, युद्ध कोणत्याही समस्येचे समाधान होणार नाही आणि युद्धामुळे दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. तसेच भाजपवर टीका करताना म्हणाले की, भाजप एकटाच देशभक्त असल्यासारखे वर्तन करत आहे. "देशभक्ती केवळ एकट्या भाजपचीच नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा 10 पटीने देशभक्त आहोत," असे सांगायला ते विसरले नाहीत.  

२०१४ च्या निवडणुकीत जनसेना पक्षाचे अध्यक्ष असलेले पवन कल्याण हे भाजपचे मित्रपक्ष होते. मात्र आता या पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. अभिनेता चिरंजीवीचे पवन कल्याण हे लहान भाऊ आहेत, तर पवन कल्याण राजकारणासोबतच दक्षिणेतील पॉवरस्टार अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News