पटकथा लेखन हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019

चित्रपट लेखनाचे भारतामध्ये सर्वसाधारणपणे कथा, पटकथा आणि संवादलेखन असे तीन भाग पाडण्यात येतात. त्यातला पटकथा लेखन हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. एकदा कथा लिहून पूर्ण झाल्यावर त्यातील वेगवेगळ्या दृश्यांची प्रसंगामध्ये विभागणी करून ते प्रसंग संवादासहित लिहावे लागतात. ही एक कला तर आहेच, पण त्यात एक तंत्रही आहे. भारतामध्ये लिखाणाला योग्य महत्त्व न दिल्या गेल्यामुळे म्हणावा तेवढा व्यावसायिकपणा त्यात आलेला नाही. पण आता चित्र बदलू लागले आहे आणि अनेकजण पूर्णवेळ पटकथा लेखक म्हणून उत्तम कामगिरी करत आहेत.

चित्रपट लेखनाचे भारतामध्ये सर्वसाधारणपणे कथा, पटकथा आणि संवादलेखन असे तीन भाग पाडण्यात येतात. त्यातला पटकथा लेखन हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. एकदा कथा लिहून पूर्ण झाल्यावर त्यातील वेगवेगळ्या दृश्यांची प्रसंगामध्ये विभागणी करून ते प्रसंग संवादासहित लिहावे लागतात. ही एक कला तर आहेच, पण त्यात एक तंत्रही आहे. भारतामध्ये लिखाणाला योग्य महत्त्व न दिल्या गेल्यामुळे म्हणावा तेवढा व्यावसायिकपणा त्यात आलेला नाही. पण आता चित्र बदलू लागले आहे आणि अनेकजण पूर्णवेळ पटकथा लेखक म्हणून उत्तम कामगिरी करत आहेत. यामध्ये आपले करिअर करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना लिखाणाची आवड तर पाहिजेच शिवाय जर चांगले प्रशिक्षण घेतले आणि भरपूर सराव केला तर यासारखा कलात्मक आनंद कुठलाही नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News