परिणितीच्या चाहत्याने केला अजब प्रकार; परिणितीही झाली थक्क

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

आपल्या आवडत्या कलाकाराला त्यांचा चाहतावर्ग अगदी डोक्‍यावर उचलून धरतो. काही चाहते तर आवडत्या कलाकारासाठी काहीही करायला तयार असतात.

आपल्या आवडत्या कलाकाराला त्यांचा चाहतावर्ग अगदी डोक्‍यावर उचलून धरतो. काही चाहते तर आवडत्या कलाकारासाठी काहीही करायला तयार असतात. याचेच एक उत्तम उदाहरण आता समोर आले आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्राच्या एका चाहत्याने तिला डोळ्यासमोर ठेवून त्याचे घर डिझाईन केले आहे. परिचा हा चाहता इंडोनेशियामधील असून त्याने त्याच्या घराच्या भिंती, स्वतःची बॅग यावर परिचे नाव कोरले आहे.

शिवाय बेडरूमची सजावटही परिच्या विविध लुकमधील फोटोंनी केली आहे. विशेष म्हणजे घरामधील छोट्या-मोठ्या वस्तूंवरही त्याने परिणीती चोप्रा हे नाव तयार करून घेतले आहे. चाहत्यांचे आपल्यावर असणारे प्रेम पाहून परिणीतीही अगदी भारावून गेली आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News