पालकांनाही अनोख्या कार्यशाळेत बसून मिळाली शिकण्याची संधी

विराज पवार
Monday, 12 August 2019
  • "हवेत तरंगणारी पेन्सिल" विद्यार्थ्येंनी स्वत: तयार केली
  • सर्वात वेगाने धावणारी मॅगलेव ट्रेन
  • कार्यशाळेत १ विद्यार्थी व पालक यांना प्रवेश दिला

पुणे : मुलांना विज्ञान प्रकल्प   करायचेत.... पण साहित्य नाही... साहित्य आहे पण मार्गदर्शन नाही... मुलांच्या मनातील कुतूहल जागृत करून त्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी दिशा ॲकॅडमी वाई आणि दै. सकाळच्या संयुक्त विद्यमाने संडे सायन्स स्कुल,पुणे यांच्या खास मुलांसाठीच्या अनोख्या विज्ञान कार्यशाळेचे नुकतेच आयोजन येत्या सोमवारी ता. १२ ऑगस्ट रोजी सातारा येथे करण्यात आले.

   कराड आणि फलटण मधील विद्यार्थ्यांना देखील प्रत्यक्ष प्रयोगातून आनंद, अनुभव मिळाला व त्यांची जिज्ञासा वाढीस लागावी यासाठी विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती संडे सायन्स स्कूलचे संचालक दिनेश निसंग यांनी दिली.

या कार्यशाळेत चुंबकांचे विविध प्रकार, चुंबकांचे गुणधर्म व चुंबकत्वाचे नियम समजून घेऊन त्यावर आधारित "हवेत तरंगणारी पेन्सिल" प्रत्येक विद्यार्थी स्वत: हाताने तयार केले व घरी घेऊन गेले . याचे प्रात्यक्षिक त्यांच्या कडून करून घेतले.जगातील सर्वात वेगाने धावणारी मॅगलेव ट्रेन याच तत्वावर कार्य करते.  

प्रयोगासाठी आवश्यक साहित्य प्रत्येक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात  देण्यात आले.हे तयार साहित्य, मॉडेल त्यानांच घरी दिले . विशेष म्हणजे हि विज्ञान कार्यशाळा सर्वाना मोफत होती. कार्यशाळेत १ विद्यार्थी व पालक यांना प्रवेश दिला होता. पालकांनाही अशा अनोख्या कार्यशाळेत बसून शिकण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी सोबत येताना फक्त पेन्सिल शार्पनर आणले होते.या कार्यशाळेचा सातारा येथे शेवटची कार्यशाळा होती.व या कार्यशाळेला भरगोस प्रतिसादही मिळाला

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News